शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

श्री णमोकार तीर्थावर पाषाणाचे जल्लोषात स्वागत, मंत्रोच्चरात ३५१ टनांच्या पाषाणाचे पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 05:35 IST

श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजाविधी केला. त्यानंतर प्रीतम शहा (पळसदेवकर), प्रकाश शेठी व विजय कासलीवाल (नांदेड) या परिवाराच्यावतीने पूजन करण्यात आले.

चांदवड (नाशिक) : राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाणे येथे निर्मित श्री णमोकार तीर्थावर ४६ फूट उंच अरिहंत भगवान यांच्या खड्गासन स्थितीतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा भव्य असा ३५१ टनाचा पाषाण १६४ चाकांच्या ट्रकमधून शनिवारी मालसाणे येथे दाखल झाला. तीर्थावर पाषाणाचे आगमन होताच जैन बांधवांनी वाजतगाजत आचार्यश्रींचा जयघोष करत स्वागत केले.श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजाविधी केला. त्यानंतर प्रीतम शहा (पळसदेवकर), प्रकाश शेठी व विजय कासलीवाल (नांदेड) या परिवाराच्यावतीने पूजन करण्यात आले. मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला, रवींद्र पाटणी यांनी पाषाणावर पुष्पवृष्टी केली, तर संतोष पेंढारी (नागपूर), तीर्थरक्षा कमिटी संजय पापडीवाल, ललित पाटणी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली.शैलेश कासलीवाल, पवन पाटणी, मनोज शहा, रवींद्र पहाडे, पारस लोहाडे, वर्धमान पांडे, राजेंद्र कासलीवाल, मनोज कासलीवाल, प्रवीण संचेती यांच्याहस्ते आचार्य कुंथुसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आचार्य श्री देवनंदीजी महाराज व नवीन नंदिजी महाराज यांचे प्रज्ञाश्रमन बहुमंडलच्यावतीने पादप्रक्षालन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले, तर ब्रह्मचारी वैशालीदीदी यांनी आभार मानले.

मान्यवरांच्या ऑनलाइन शुभेच्छायाप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, खासदार कृपाल तुमाणे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाइन भाषणात शुभेच्छा दिल्या व णमोकार तीर्थावर भविष्यात लागणाऱ्या कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महावीर गंगवाल, अनिल जमगे, प्रमोद कासलीवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नवीन पहाडे, विनोद लोहाडे, जयकुमार कासलीवाल यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले.

टॅग्स :Nashikनाशिक