शंभो महादेव पालखीचे खोरमध्ये स्वागत
By Admin | Updated: July 4, 2016 01:55 IST2016-07-04T01:55:14+5:302016-07-04T01:55:14+5:30
‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’च्या जयघोषात व टाळमृदंगाच्या गजरात श्री शंभो महादेव पालखी सोहळ्याचे खोर (ता. दौंड) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले

शंभो महादेव पालखीचे खोरमध्ये स्वागत
खोर : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’च्या जयघोषात व टाळमृदंगाच्या गजरात श्री शंभो महादेव पालखी सोहळ्याचे खोर (ता. दौंड) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. हरिभाऊ शिंदे यांच्या सर्जा-राजा बैलजोडीला हा रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. श्रीक्षेत्र राहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा पायी प्रवास असलेला शंभो महादेव पालखी सोहळा शनिवारी भांडगाव येथील सकाळची न्याहारी उरकून खोर येथे दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाली. खोरमधील खिंडीचीवाडी ग्रामस्थांनी या पालखीचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. खोरचे सरपंच रामचंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत खोर गावठाणामध्ये पालखीचे स्वागत केले. या वेळी शंखनाथजीमहाराज, माजी सरपंच रघुनाथ नेवसे, मोहन डोंबे, पोपट चौधरी, विकास चौधरी, गणेश चौधरी, सुभाष डोंबे, घनश्याम जाधव, दादा चौधरी, रवींद्र अत्रे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दुपारची पंगत पिंपळाचीवाडी येथे पार पडून हा पालखी सोहळा बारामतीकडे मार्गस्थ होऊन कौलेवाडी येथील गवळीबाबा मंदिरामध्ये सायंकाळचे चहापाणी उरकून वढाणे येथे मुक्कामी गेला.