माऊलींचे माहेरात मनोभावे स्वागत!

By Admin | Updated: August 21, 2015 23:51 IST2015-08-21T23:51:24+5:302015-08-21T23:51:24+5:30

शेगाव येथे अडीच लाख भाविकांची मांदियाळी.

Welcome to Moulee Maher! | माऊलींचे माहेरात मनोभावे स्वागत!

माऊलींचे माहेरात मनोभावे स्वागत!

गजानन कलोरे/ शेगाव (बुलडाणा):
'न करि आळस जाय पंढरीसी!
अवघी सुखराशी तेथे आहे!
पाहता भिवंरा करी एक स्नान!
घाली लोटागंन पुंडलिका!!'
संत येती घरा, तोची दिवाळी दसरा.. या उक्तीप्रमाणे शुक्रवारी शेगाव येथील नागरिकांनी तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ प्रवासानंतर माहेरी आलेल्या माऊलींचे, संतश्री गजानन महाराजांच्या पालखीचे मनोभावे स्वागत केले.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर २२ दिवसांमध्ये तब्बल ५६३ किलोमीटरचा प्रवास करून श्रींची पालखी शुक्रवारी संत नगरीत दाखल झाली. शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्रींची पालखी येताच संत गजानन महाराज शिक्षण संस्थेचे तथा संस्थानचे विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन केले. त्यानंतर श्री गजानन इंग्लिश स्कूल आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच संत गजानन भक्तांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात आली. श्री गजानन वाटिकेजवळ संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त निळकंठदादा पाटील, अध्यक्ष डॉ. डांगरा, विश्‍वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर संतनगरीतून श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. पालखीचे ठिकठिकाणी मनोभावे स्वागत करण्यात आले. संतनगरीत पालखीपूर्वी आणि पालखीसोबत दाखल झालेल्या भाविकांसाठी वाटिकेजवळ संस्थानच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यांच्या गर्दीमुळे शेगावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिंडीचे एक टोक शेगावात, तर दुसरे खामगावात
आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ह्यश्रींह्णच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. महिनाभराच्या प्रवासानंतर पालखी गुरूवारी खामगाव येथे पोहोचली. शुक्रवारी पहाटेच पालखीने शेगावच्या दिशेने मार्गक्रमण केले. पालखी शेगावकडे मार्गस्थ होण्यापूर्वीच खामगाव शहरातील नागरिकांसह पश्‍चिम विदर्भाच्या कानाकोपर्‍यातील भाविक दिंडी मार्गावर निघाले. पहाटे तीन वाजतापासूनच भाविकांचा ओढा या मार्गावर सुरू झाला होता. पालखी निघेपर्यंत आणि पालखी निघाल्यानंतरही हा ओढा निरंतर सुरू होता. दिवस उजाडेपर्यंत तब्बल लाखाच्यावर भाविकांची दिंडी मार्गावर गर्दी झाल्याने, गर्दीचे एक टोक संत गजानन महाराज मंदिरात तर शेवटचे टोक खामगावात अशी परिस्थिती सकाळी ९ वाजताच्या दरम्यान होती. दिंडी मार्गावरील आबाल वृद्धांच्या गर्दीमुळे या मार्गावर पोलिस प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

Web Title: Welcome to Moulee Maher!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.