फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत

By Admin | Updated: July 4, 2016 01:48 IST2016-07-04T01:48:24+5:302016-07-04T01:48:24+5:30

टाळ-मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Welcome to fireworks fireworks | फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत

फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत


वरवंड : टाळ-मृदंगाच्या गजरात व विठुरायाच्या जयघोषात श्री जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच पालखी सोहळ्याच्या वेळेस पावसाचे आगमन झाले.
ग्रामस्थांनी स्वागत करण्यासाठी ग्रामस्त गावच्या वेशीवर मोठ्या संख्येने हजेरी लावून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तसेच पालखी सोहळ्याचे वरवंड येथे सायंकाळी ६.२० च्या दरम्यान आगमन झाल्याबरोबर फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी स्वागत कमानी, रांगोळीच्या पायघडया व पालखी सोहळा आपल्या गावी येणार असल्याने ग्रामस्थांनी घराच्या दारासमोर रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता व विठुरायाने आपली हाक ऐकली वाटते व पालखी सोहळा येताच पावसाने सुरुवात केली आहे. या वेळी तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष घरळे, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सरपंच संजय खडके, ग्रामसेवक अशोक शेळके, रत्नाकर दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, संजय दिवेकर, नाना श्रीरंग दिवेकर, नाना शेळके, अशोक फरगडे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
मंदिरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. गावामध्ये या सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जेवणाची व नाष्ट्याची ग्रामस्थांबरोबर गावांतील ग्रामस्थ, श्री गोपीनाथ ट्रान्स्पोर्ट, शिवकृपा तरुण मंडळ, शुभकार्य व्यावसायिक संघ या मंडळांनी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आली.

Web Title: Welcome to fireworks fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.