पाच दिवसांचा आठवडा; प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे

By Admin | Updated: May 24, 2017 03:02 IST2017-05-24T03:02:08+5:302017-05-24T03:02:08+5:30

राज्यातील शिक्षकांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद

Week of five days; Proposal before chief minister | पाच दिवसांचा आठवडा; प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे

पाच दिवसांचा आठवडा; प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. या मागणीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने हा प्रस्ताव अभिप्राय मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवला आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच दिवसांच्या आठवड्याची घोषणा करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.
शिक्षण विभागाने मुलांसाठी शाळांना पाच दिवसांचा आठवडा सक्तीचा करण्याचे आदेश द्यावेत, असे आवाहन बालदिनानिमित्त १३ नोव्हेंबर २०१६ रोजी निवेदनाद्वारे केले होते. त्यावर काय कार्यवाही केली, याबाबत २५ एप्रिल २०१७ रोजी माहिती अधिकारात विचारणा केली होती.

Web Title: Week of five days; Proposal before chief minister