विवाहसोहळ्याचा होतोय इव्हेंट!
By Admin | Updated: April 18, 2017 02:46 IST2017-04-18T02:46:55+5:302017-04-18T02:46:55+5:30
विवाह म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधिवत पध्दतीने लग्नसोहळा पार पडावा

विवाहसोहळ्याचा होतोय इव्हेंट!
पुणे : विवाह म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन. धार्मिक आणि विधिवत पध्दतीने लग्नसोहळा पार पडावा, यासाठी
वधू आणि वरपक्षाची लगबग सुरु असते. मात्र, आजकाल विवाह सोहळा खर्चिक बनला आहे.
एकीकडे कार्यालयांचे भाडे, मानपान याचे खर्च वाढत असताना लग्नासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रक्ट दिले जात आहे. प्री-वेडिंग फोटो शूट, डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग यामुळे लग्नाच्या खर्चाने लाखांचा टप्पा गाठला आहे.
बदलत्या काळाप्रमाणे नववनवीन ट्रेंड डोकावत असतात. विवाह सोहळाही त्याला अपवाद राहिलेला नाही. बदललेल्या जीवनशैलीमुळे आपला विवाह हटके पध्दतीने पार पडावा, अशी तरूण-तरुणींची
इच्छा असते. लग्न सोहळयात कामांची यादी संपता संपत नाही. प्रत्येकाला खुश ठेवता यावे, वरपक्षाला उणीव काढण्याची संधी मिळू नये, असाच वधू पक्षाचा प्रयत्न असतो.
विवाहसोहळा कोणत्याही अडथळयाशिवाय पार पडावा, यासाठी इव्हेंट कंपनीला पाचारण केले जाते. इव्हेंट कंपनीकडील पॅकेज साधारणपणे ५ लाख रुपयांपासून सुरु होते. इव्हेंट कंपनीला काम सोपवले की वधू पक्षाचा बरासचा भार हलका होतो. मात्र, खर्चाचे गणित वाढते. बरेचदा, वरपक्षाकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जात असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी इव्हेंट कंपनीची निवड केली जाते. बरेचदा, पालकांपेक्षा मुलगा-मुलगीच याबाबतीत पुढाकार घेतात. पालक याबाबतीत फारसे उत्सुक नसतात. त्यामुळेच लग्नांचा इव्हेंट होताना पहायला मिळत आहे.
प्री-वेडिंग फोटो शूटपासून लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. मध्यमवर्गीय कुटुंबांमधील तरुणांमध्ये ही के्रझ मोठ्या प्रमाणात आढळून
येते. फोटोग्राफरच्या मदतीने फोटो शूटचे ठिकाण, थीम आदी बाबी ठरवल्या जातात.
या शूटचा खर्च साधारणपणे १० हजार रुपयांपासून सुरु होतो. गेल्या दोन वर्षात या ट्रेंडची मागणी खूप वाढली आहे. पर्वती, खडकवासला, सिंहगड या ठिकाणांपासून गोव्यापर्यंत कोणतेही आवडीचे ठिकाण ठरवून तेथे फोटो शूट केले जाते. या निमित्ताने मुला-मुलीला एकमेकांना समजून, जाणून घेण्याची संधी मिळते, असे मत तरुणांची ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.