विठ्ठल-रुक्मिणीचा थाटात विवाह सोहळा
By Admin | Updated: January 25, 2015 01:41 IST2015-01-25T01:41:46+5:302015-01-25T01:41:46+5:30
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरेने होत असलेला विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी सकाळी पार पडला.

विठ्ठल-रुक्मिणीचा थाटात विवाह सोहळा
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरेने होत असलेला विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी सकाळी पार पडला. सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेला पांढरा पोशाख घालण्यात आला होता. तसेच विविध अंलकार परिधान केले होते.
या सोहळ्याप्रसंगी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांच्या हस्ते सकाळी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा झाली. तर, सायंकाळी प्रदक्षिणा मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रतिकात्मक मूर्ती रथात ठेवण्यात आल्या होत्या. शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी या कालावधीत मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
मंदिराची रंगरंगोटी
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तब्बल दहा वर्षांनी रंगरंगोटी करण्यात येत आहे. यापूर्वी १९९६ साली विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली होती. आता मंदिराच्या नामदेव पायरी परिसर तसेच पश्चिम द्वार परिसरला रंगरंगोटीचे काम सुरू आहे. हे काम बंगळुरू येथील पांडुरंग संस्था मोफत करीत आहे. विठ्ठल मंदिरातील लाकडी सभा मंडपालाही पॉलिश करण्याच्या कामाचा ठेका सोलापूर येथील खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. या कामास १ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
असून यास एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी मंदिराच्या कळसाला रंग देण्यात आला आहे. आता मंदिराच्या काही भागाला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
- शिवाजी कादबाने, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती