संकेतस्थळ मराठीकरणास संचालनालयाची असमर्थता

By Admin | Updated: June 30, 2014 00:22 IST2014-06-30T00:22:48+5:302014-06-30T00:22:48+5:30

महाविद्यालयांची संकेतस्थळे मराठीत करण्यात यावीत, ही प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी उच्च शिक्षण संचालनालयाने फेटाळून लावली आहे.

Website Inability to Operate Marathi | संकेतस्थळ मराठीकरणास संचालनालयाची असमर्थता

संकेतस्थळ मराठीकरणास संचालनालयाची असमर्थता

>मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांची संकेतस्थळे मराठीत करण्यात यावीत, ही प्रहार विद्यार्थी संघटनेची मागणी उच्च शिक्षण संचालनालयाने फेटाळून लावली आहे. महाविद्यालयांना संकेतस्थळे सुरु करण्यास अनुदान देण्यात येत नसल्याने  संकेतस्थळे मराठीतून करणो जिकिरीचे वाटते, असा शेरा संचालनालयाने मारला आहे. संचालनालयाच्या या भूमिकेला प्रहार विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला असून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील विद्यापीठांशी संलगA हजारो महाविद्यालये सुरू आहेत. या महाविद्यालयांची संकेतस्थळे मराठी आणि इंग्रजी भाषेत असायला हवीत, अशी मागणी प्रहार संघटनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार टोपे यांनी उच्च शिक्षण संचालकांकडून अहवाल मागवला होता. संचालनालयाने याबाबतचा अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर केला. शासनाकडून महाविद्यालयांची संकेतस्थळे विकसित करण्यास अनुदान देण्यात येत नाही. तसेच विविध माध्यमांच्या भाषांमुळे सर्व महाविद्यालयांना संकेतस्थळ विकसित करण्यास बंधनकारक करणो जिकिरीचे वाटते, असे या अहवालात उच्च शिक्षण संचालकांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
 
राज्यात मराठी भाषेला दिली जाणारी दुय्यम वागणूक प्रहार विद्यार्थी संघटना सहन करणार नाही. संचालनालयाने अहवालात दुरूस्ती करून सर्व महाविद्यालयांना संकेतस्थळ मराठीत करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अॅड मनोज टेकाडे यांनी दिला आहे.

Web Title: Website Inability to Operate Marathi