‘इसिस’च्या प्रचाराची वेबसाइट ब्लॉक

By Admin | Updated: September 27, 2015 05:50 IST2015-09-27T05:50:32+5:302015-09-27T05:50:32+5:30

इंडोनेशियाहून इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया तथा ‘इसिस’साठी चालविली जाणारी वेबसाइट भारतीय सुरक्षा संस्थांनी नुकतीच ‘ब्लॉक’ केली आहे.

Website block of 'Isis' campaign | ‘इसिस’च्या प्रचाराची वेबसाइट ब्लॉक

‘इसिस’च्या प्रचाराची वेबसाइट ब्लॉक

डिप्पी वांकाणी, मुंबई
इंडोनेशियाहून इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया तथा ‘इसिस’साठी चालविली जाणारी वेबसाइट भारतीय सुरक्षा संस्थांनी नुकतीच ‘ब्लॉक’ केली आहे. ‘इसिस’चा आॅनलाइन प्रचार करण्याच्या प्रकाराचा मुकाबला करणाऱ्या सुरक्षा संस्थांनी ही कामगिरी केली आहे.
या वेबसाइटच्या कारवाया संशयास्पद असल्याचे आढळल्यानंतरच ती ब्लॉक करण्यात आली. ‘आयएसडीएआरटी’चा अरबीतील अर्थ प्रसार किंवा प्रसिद्धी असा होतो. दहशतवादविरोधी संस्था इंटरनेटवर अहोरात्र नजर ठेवून
आहेत. जगभरातील युवकांना
आपल्या संघटनेत प्रवेश देण्यासाठी इंटरनेट हे माध्यम ‘इसिस’ला
सर्वात प्रभावी ठरले आहे. कल्याणमधील चार युवक ‘इसिस’मध्ये सामील झाले होते. त्यापैकी अरीब अरीब माजीद हा परतला आहे. आपण इसिसशी कशाप्रकारे आॅनलाइन संपर्कात होतो, हे त्याने सांगितले आहे.
अगदी अलीकडील काळात अफसा जबीन ऊर्फ निक्की जोसेफ या तरुणीला संयुक्त अरब अमिरातीतून हैदराबादला हाकलण्यात आले. तीसुद्धा भारतीय युवकांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी चिथावणी देत होती, असे आढळले आहे.
इसिसमध्ये सामील होण्यासाठी व त्या दृष्टीने चिथावणी देणाऱ्या अफसा जबीन हिने इंटरनेटचा वापर केला होता. अशाच एका अभियंत्याला तिने लग्नाचे आश्वासन दिले होते. हा अभियंता इसिसमध्ये सामील होण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक करण्यात आली. इंडोनेशियातून चालविल्या जाणाऱ्या या वेबसाईटवर आमचे गेल्या काही दिवसांपासून लक्ष होते. ही वेबसाईट इंडोनेशियाची असली तरी त्यातील मजकूर अरबी होता.
आम्ही त्या मजकुराचा सखोल अभ्यास केला असता तो केवळ इसिसचा प्रसार करणारा नव्हता तर इसिसमध्ये सामील होण्यासाठी चिथावणी देणारा होता व इसिसमध्ये कसे सामील व्हावे, याची माहिती देणारा होता, असे आढळले. त्यानंतरच आम्ही ही वेबसाईट ब्लॉक केल्याचे सूत्राने सांगितले. कोणीही वेबसाईटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास ‘दुष्प्रचार करणारी वेबसाईट ब्लॉक’ करण्यात आल्याचा संदेश येतो.

Web Title: Website block of 'Isis' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.