शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खाते सपशेल नापास, पावसाचा अंदाज भरकटला; पेरण्या संकटात, राज्यभरातून आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 10:30 IST

जून महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यात पावसाचे आगमन होईल. आगमनानंतर पाऊस लागून राहील, असे अंदाज हवामान खाते आठवड्याभरापासून देत आहे.

मुंबई : अरबी समुद्रातील बिपोरजॉय चक्रीवादळानंतर मान्सून पुढे सरकेल आणि जून महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र काबीज करत, पुरेशा पावसाची बरसात करेल, असे हवामान खात्याने वर्तविलेले या मोसमातील सगळे अंदाज अक्षरश: खोटे ठरत आहेत. हवामान खात्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्याही संकटात आल्याने हवामान खाते आणि बियाणे कंपन्यांचे साटेलोटे तर नाही ना, अशी आगपाखड केली जात आहे.

जून महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यात पावसाचे आगमन होईल. आगमनानंतर पाऊस लागून राहील, असे अंदाज हवामान खाते आठवड्याभरापासून देत आहे. प्रत्यक्षात मात्र मान्सून दाखल होण्यास विलंब होत असून, आता २३ जून उजाडला, तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. परिणामी, मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे हवामान खात्याच्या नावाने बोटे मोडली आहेत. मुंबईतल्या उकाड्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढले असून, मुंबईकर चातकासारखा पावसाची वाट पाहत आहे. शुक्रवारी सकाळी तुरळक पडलेल्या पावसानेही दिवसभर उघडीप घेतल्याने मुंबईकर उन्हाने आणि उकाड्याने हैराण झाले होते.

मान्सून लेट कारण...बिपोरजॉय चक्रीवादळामुळे आता मान्सूनसाठी हवामान अनुकूल होण्यास वेळ लागतो आहे. हवामान अनुकूल असले, तरी काही कारणांमुळे मान्सूनची प्रगती खुंटते. हवामान खाते निरीक्षणे नोंदविते आणि अंदाज देते. एखाद्या ठिकाणी मान्सून दाखल झाला, तरी सलग दोन दिवस आणि २.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्याचे घोषित केले जाते. आता रविवारपासून पाऊस होण्यास सुरुवात होईल.- सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग.

आता कुठे आहे मान्सून?विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांत हवामान अनुकूल आहे.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग.

टॅग्स :Rainपाऊस