शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा भगवा घालून NCP च्या लोकांनी कार्यालय फोडलं; तानाजी सावंतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 11:25 IST

कात्रजमधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर असून सासवड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाला भेट देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा भगवा घालून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझे ऑफिस फोडलं असा दावा तानाजी सावंत यांनी केला. 

तानाजी सावंत म्हणाले की, माझं ऑफिस फोडणं इतके सोप्प नाही. कार्यालय फोडणाऱ्यांनी औकातीत राहावं असं इशारा दिला होता. भविष्यात ज्यांनी कार्यालयावर दगड फेकले त्यांना कळेलच. सत्तेचा माज आम्ही करणार नाही. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी इथे आलो आहे. माझे शिवसैनिक तिथे नव्हते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असा आरोप त्यांनी केला. 

शिवसेनेचे तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली. शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. शिवसैनिक अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. असे असताना  दक्षिण उपनगरातील शिवसैनिकामध्ये असलेला असंतोष उफाळून आला आणि पहिल्यापासून पक्षात नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. 

कात्रजमधील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर नाराज शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कात्रज चौकातील शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले. यानंतर पोलिसांनी याठिकाणी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करीत शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. 

औकातीत राहावं, अन्यथा ‘जशास तसे...तोडफोड करणाऱ्यांनी औकातीत राहावे, अन्यथा ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशारा सावंत यांनी सोशल मीडियावरून इशारा दिला होता. त्यांचे बंधू, माजी जिल्हाप्रमुख शिवाजी सावंत यांनी मात्र तोडफोड करणारे जर शिवसैनिक असतील तर आमच्याच लोकांवर कारवाई कशी करणार? असा सवाल उपस्थित केला होता. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाTanaji Sawantतानाजी सावंत