‘एम्स’प्रमाणे ‘जेजे’ सुसज्ज करणार - विनोद तावडे

By Admin | Updated: February 13, 2016 01:51 IST2016-02-13T01:51:27+5:302016-02-13T01:51:27+5:30

दिल्लीतील सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या एम्स रूग्णालयाप्रमाणे मुंबईतील जेजे रूग्णालयाचा कायापालट येत्या तीन वर्षांत करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

Wearing 'JJ' like 'AIIMS' - Vinod Tawde | ‘एम्स’प्रमाणे ‘जेजे’ सुसज्ज करणार - विनोद तावडे

‘एम्स’प्रमाणे ‘जेजे’ सुसज्ज करणार - विनोद तावडे

मुंबई : दिल्लीतील सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या एम्स रूग्णालयाप्रमाणे मुंबईतील जेजे रूग्णालयाचा कायापालट येत्या तीन वर्षांत करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. जेजे रूग्णालयातील चतुर्थ श्रेणीमधील बदली काम करणाऱ्या ४७४ कामगारांना शासकीय सेवेत कायम करण्याचे नियुक्ती पत्र देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील विविध शासकीय महाविद्यालयांत सुमारे २० वर्षांपासून बदली कामगार म्हणून काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीमधील ७७४ कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच शासनाने घेतला होता. त्यातील ४७४ कर्मचारी ही जेजे रूग्णालयात कार्यरत आहेत. त्यांपैकी १५ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी प्रातिनिधीक स्वरुपात कायम सेवेचे नियुक्ती पत्र तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रूग्णालयाच्या आवारात हा समारंभ पार पडला.
यावेळी तावडे म्हणाले की, जेजे रुग्णालय उत्तम दर्जाचे सुपरस्पेशलिटी रुग्णालय म्हणून नावारुपास आणले जाईल. यावेळी तावडे यांनी कर्मचारी आणि नर्सेसचे प्रश्न जाणून घेत ते तत्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Wearing 'JJ' like 'AIIMS' - Vinod Tawde