पुजारी टोळीला शस्त्रे पुरविणारा गजाआड
By Admin | Updated: November 22, 2014 03:23 IST2014-11-22T03:23:23+5:302014-11-22T03:23:23+5:30
गँगस्टर रवि पुजारी टोळीला शस्त्रसाठा पुरविणाऱ्या एजंटला गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून गजाआड केले. रवि सिंग असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे गुन्हे शाखा कसून चौकशी करीत आहे.

पुजारी टोळीला शस्त्रे पुरविणारा गजाआड
मुंबई : गँगस्टर रवि पुजारी टोळीला शस्त्रसाठा पुरविणाऱ्या एजंटला गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून गजाआड केले. रवि सिंग असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे गुन्हे शाखा कसून चौकशी करीत आहे.
सिंग आणि पुजारी टोळीतल्या इशरत शेख ऊर्फ राजा आणि अनिस मर्चंट यांचे जुने संबंध असल्याचे गुन्हे शाखेला समजले आहे. पुजारी टोळीसाठी शस्त्रसाठा, शूटर गोळा करण्याची जबाबदारी या दोघांवर असे. हे दोघे सिंगच्या मदतीने शस्त्रांची जमवाजमव करीत. निर्माते अली करीम मोरानी यांच्या घरावरील गोळीबार तसेच दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येसाठी पुजारी टोळीने सिंगच्या माध्यमातून ६ रिव्हॉल्व्हर व किमान ३० जिवंत काडतुसे मुंबईत आणली होती. याव्यतिरिक्त सिंग मुंबई अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असलेल्या संघटित टोळ्यांशी संधान साधून असावा, असा संशय गुन्हे शाखेला आहे. त्याने मुंबईत किती शस्त्रे पाठवली, कोणाकरवी कोणासाठी पाठवली याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. (प्रतिनिधी)