शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याची मनाची श्रीमंती मोठी : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 11:41 IST

माझा मराठवाडा मागसलेला असून, मराठवाड्यावर निसर्ग कोपला आहे असा न्यूनगंडही कोणी ठेऊ नये...

ठळक मुद्देमराठवाड्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कारा'ने गौरव

पुणे : मराठवाड्यामध्ये पैशांची श्रीमंती कमी आहे, पण मनाची श्रीमंती मोठी आहे. त्यामुळे मराठवाडा मागासलेला आहे हे विधान मला योग्य वाटत नाही़  पैशाची श्रीमंती केव्हाही गळून पडेल पण मनाची श्रीमंती कायमची असते़ असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.  माझा मराठवाडा मागसलेला असून, मराठवाड्यावर निसर्ग कोपला आहे असा न्यूनगंडही कोणी ठेऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले़ मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने, मराठवाड्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कारा'ने गौरविण्यात आले.  त्यावेळी अ‍ॅड. निकम बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर होते़  यावेळी डॉ. भगवान कापसे यांना कृषी पुरस्कार, पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना प्रशासकीय पुरस्कार, भास्कर पेरे पाटील यांना सामाजिक पुरस्कार, भारत सातपुते यांना शैक्षणिक पुरस्कार, राजेश मंडलिक यांना उद्योजक पुरस्काराने तसेच संगमेश्वर बोमणे, लहुराज गंडे, अ‍ॅड. सुदाम खोसे, दमयंती खोसे यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आले.  समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोल पिंगळीकर आणि सचिव दत्ताजी मेहत्रे यावेळी उपस्थित होते.अ‍ॅड. निकम म्हणाले की,  पाऊस नसलेल्या भागातील तरुण स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुण्यात येतात. पदरी निराशा पडल्यानंतर ते निराश होतात. अशावेळी त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. छत्री कधी पाऊस थांबवू शकत नाही. पण ती पावसात उभे राहण्याचे धाडस निर्माण करते. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली नाही. पण तो जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. हा आत्मविश्वास वाढविण्याचे काम मराठवाडा समन्वय समिती करीत असल्याचे ते म्हणाले़ म्हैसेकर यांनी, माझे मराठवाड्याशी अतूट नाते असल्याचे सांगितले़ आज बाहेर गेलो तरी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. काही चांगल्या प्रकल्पांमुळे मराठवाड्याची परिस्थिती सुधारत आहे. धडपड करण्याची प्रवृत्ती माणसाला शिकवत असल्याचेही ते म्हणाले़यावेळी वैभवशाली मराठवाडा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना परदेशी आणि महेश थोरवे यांनी केले. --------------

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाUjjwal Nikamउज्ज्वल निकम