साहित्य उशिरा पुरविणाऱ्यांवर कारवाई करणार

By Admin | Updated: March 29, 2016 01:35 IST2016-03-29T01:35:36+5:302016-03-29T01:35:36+5:30

शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेटरसह अन्य साहित्य पुरविण्यात यंदा कमालीचा विलंब झाल्याची कबुली देत या विलंबाची चौकशी करून त्यासाठी जबाबदार असलेल्या

We will take action against those who provide late literature | साहित्य उशिरा पुरविणाऱ्यांवर कारवाई करणार

साहित्य उशिरा पुरविणाऱ्यांवर कारवाई करणार

मुंबई : शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेटरसह अन्य साहित्य पुरविण्यात यंदा कमालीचा विलंब झाल्याची कबुली देत या विलंबाची चौकशी करून त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज विधानसभेत दिले.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत आवश्यक वस्तू आणि साहित्याचा पुरवठा न झाल्याबाबत विधानसभा सदस्य संजय सावकारे, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्रीमहोदय अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. कंत्राटदार अन् अधिकाऱ्यांच्या हेव्यादाव्यात साहित्याचा पुरवठा रखडल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: We will take action against those who provide late literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.