शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 14:43 IST

उद्धव ठाकरेंनी सिल्लोड मतदारसंघात प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. 

श्यामकुमार पुरे,सिल्लोडMaharashtra Assembl Election 2024: सिल्लोड येथील जाहीर सभेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केला. या प्रचारसभेनंतर माध्यमांशी बोलतांना अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. 'मला काय पाडता, मीच सारा कार्यकर्त्यांचा फौज फाटा घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाचा बिस्मिला करणार आहे. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार आता निवडून येणार नाही. उबाठाचा सुपडा साफ करणार आहे. मला काय जेल मध्ये टाकता उद्धव ठाकरे यांच्या अजून ४ चौकशा बाकी आहेत. युतीचे सरकार आल्यावर आम्हीच त्यांना जेलमध्ये टाकू', असा इशारा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

"उद्धव ठाकरे यांची सरकार उलथून टाकण्यात व मुख्यमंत्री बदलण्याच्या भूमिकेत माझी प्रमुख भूमिका होती. त्यामुळे ठाकरे यांचा थयथयाट होत आहे. भाजप शिवसेनेचा दुश्मन आहे आणि मला पाडण्यासाठी तुम्ही भाजपाचे पाया पडताय. भाजपच्या मतांची भीक मागताय', असा सनसनाटी पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले होते.

"तुमचे आमचे (भाजप-उद्धवसेना) मतभेद आहेत. त्याच्यासाठी कुणी माझ्याशी बोलायला तयार असाल, तर मी बोलायला तयार आहे. पण, आता आपण सर्व मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकू. या सिल्लोडची दहशत गुंडा गर्दी दूर करण्यासाठी सुरेश बनकर यांना निवडून द्या व गद्दार सत्तार यांना पाडा, नव्हे तर गाडा", असे वक्तव्य केले होते.

मोदींना शिव्या देतात अन् भाजपची मदत मागताय..

"२०१९ मध्ये त्यांना माझी दहशत, दादागिरी दिसली नाही का? मी दहशत माजवतो. लांडा बाडा आहे, याची अक्कल तेव्हा नव्हती का? तेव्हा माझी आरती करत होते? एका मंचावर मोदींना आणि भाजपला शिव्या देता आणि त्याच मंचावर सत्तारला गाडण्यासाठी भाजपला मदत करा, असे आवाहन करता हे कोणते राजकारण आहे? त्यांना डोक्याच्या डॉक्टरला दाखवावे लागेल", असा टोला अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

 "दानवे माझ्या सोबत आहेत"

उद्धव ठाकरे व उद्धवसेनेचा उमेदवार घाबरला आहे. म्हणून भाजपला मतांची भीक मागत आहे. मी युतीचा उमेदवार आहे. भाजप आणि दानवे माझ्या सोबत आहे उद्धव ठाकरे यांना सिल्लोडमधून काही मिळणार नाही. पण, याचा फटका त्यांच्या जिल्ह्यातील उमेदवारांना बसेल जिल्ह्यात उबाठाचा सुपडा साफ होईल", असा इशारा अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिला.

"मुख्यमंत्री पदावरून घरी बसवले म्हणून जलसी"

"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव करून आम्ही त्यांना दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून घरी बसवले. जनतेच्या मनातील काम करणारा, लोकांना भेटणारा, विकासाला गती देणारा मुख्यमंत्री आम्ही खुर्चीवर बसवला याची जलसी असल्याने ठाकरे माझ्यावर असे आरोप करत आहेत, पण मला काही फरक पडत नाही जनता याचे उत्तर मतपेटीतून देईल", असे उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsillod-acसिल्लोडAbdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरे