शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

... तर बस स्टॉप व गणेश मंडळांजवळ सचिन तेंडुलकर दानपेटी ठेवू; बच्चू कडूंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 11:53 IST

Bacchu kadu vs Sachin Tendulkar: आमचा विरोध तेंडुलकरना नाही परंतु भारतरत्न व्यक्तीस ही बाब अशोभनीय आहे, असे म्हणत बच्चू कडूंचे तेंडूलकरच्या बंगल्यासमोर आंदोलन

ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या विरोधात प्रहारचे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. एकतर सचिनने जुगाराची प्रसिद्धी करणारी जाहिरात सोडावी किंवा भारतरत्न परत करावे, अशी मागणी कडू यांनी केली आहे. यासाठी कडू यांनी आज सचिनच्या घराबाहेर आंदोलन केले. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वारंवार paytm first जुगाराची जाहीरात बंद करण्याची विनंती केली. परंतु अद्याप ही जाहीरात बंद झालेली नाही. आमचा विरोध तेंडुलकरना नाही परंतु भारतरत्न व्यक्तीस ही बाब अशोभनीय आहे. एकतर त्यांनी जाहीरात बंद करावी नाही तर भारतरत्न परत करावा, अशी आमची मागणी आहे असे कडू म्हणाले. 

सचिनने यापैकी काही केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप व गणेश मंडळांजवळ तेंडुलकर भिकपेटी व तेंडुलकर सुचना पेटी लावण्यात येणार आहे, असा इशारा कडू यांनी दिला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत, असा आरोप कडू यांनी केला आहे. 

सचिन तेंडुलकरचे भरपूर चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या जाहीरातीचा परिणाम लहान मुलांपासून सगळ्यांवर होत आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही प्रत्येक गणेशमंडळात दानपेटी ठेवणार आहोत. 10 दिवस ही दानपेटी गणेशमंडळात ठेवणार. त्यानंतर त्या सर्व दानपेट्यांमधील रक्कम एकत्र करुन सचिन तेंडुलकरांना देणार आहे, असे कडू म्हणाले. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूSachin Tendulkarसचिन तेंडुलकर