शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'पुन्हा लढू, नव्याने उभे राहू, पण राष्ट्रवादीची साथ सोडा, असं सांगितलं तर उद्धव ठाकरे म्हणाले...' आढळरावांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:41 IST

Shivajirao Adhalrao Patil: शिवसेनेचे पुण्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या धोरणावर आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेत केलेल्या बंडानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे पुण्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या धोरणावर आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

आढळराव पाटील म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा, शरद पवार यांनी ज्यांच्यासोबत आघाडी केली, त्यांना त्यांनी संपवलं. त्यामुळे त्यांची साथ नको, मग आम्ही पराभूत झालो तरी बेहत्तर, आम्ही पुन्हा उभे राहू. ममता, केजरीवालांच्या मागे कुणी नाही, आपल्यामागे बाळासाहेब आहेत. चला मैदानात, आपण उभं राहू, नव्याने लढू, काही काळ लागेल, पण उभं राहू, मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे शक्य होणार नाही, राष्ट्रवादीला सोडून चालणार नाही, असा दावा आढळराव यांनी केला.

दरम्यान, गेल्या 15 वर्षे मी खासदार राहिलो आणि केवळ एका फेसबुक पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं. एकनाथ शिंदेंना आमच्या अडचणी माहिती होत्या, निवडून येताना काय समस्या येतात याची जाणीव त्यांना आहे. मात्र, गेल्या 15 वर्षे या जिल्हयात मी खासदार होतो, मी शिवसेना जिल्ह्यातील गावाखेड्यात नेली वाढवली, येथील शिवसैनिकासाठी मी भांडतोय. पण, एका पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी केली, याची वेदना आढळराव पाटील यांनी बोलून दाखवली.

शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली होती.  

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस