शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राला ॲडजेस्ट करू, तुम्हालाही न्याय देऊ, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलं आश्वासन 

By यदू जोशी | Updated: November 23, 2023 12:39 IST

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामावून घेताना आपल्या लोकांच्या उमेदवारीबाबत अन्याय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या बैठकीत दिला

 - यदु जोशी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामावून घेताना आपल्या लोकांच्या उमेदवारीबाबत अन्याय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या बैठकीत दिला.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी; उत्तन येथे भाजपचे निवडणूक प्रमुख व प्रभारींचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. शिवसेनेशी आपली नैसर्गिक युती आहे. त्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यात अडचण वाटत नाही, पण राष्ट्रवादीचे काय? ते लोकसभा अन् पुढे विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणार नाहीत का, असा प्रश्न काही प्रभारी व प्रमुखांनी केला. त्यावर फडणवीस यांनी विस्ताराने उत्तर दिले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीसारखा मोठा पक्ष फुटणे आणि त्यांच्यातला मोठा भाग आपल्यासोबत येणे हा भाजपचा दुहेरी फायदा आहे. याची प्रचिती सगळ्यांना निवडणूक निकालात नक्कीच येईल. विधानसभेला काय होईल, याची चिंता तुम्ही करु नका. तुमच्या कोणावरही आच येणार नाही याची काळजी आम्ही सगळे घेऊ. दोन्ही मित्रपक्षांचे आणि आपले समसमान बळ आहे, अशा ठिकाणी काही अडचणी नक्कीच येतील, पण त्या सोडवल्या जातील.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

'फायद्यातोट्याचे गणित मांडायचे नाही'सामाजिक ताणतणावाचे प्रश्न भाजपच सोडवू शकते असा सर्वांचा विश्वास आहे. अशावेळी राजकीय फायद्या-तोट्याचे गणित मांडायचे नाही. आपला हेतू प्रामाणिक आहे आणि आपणच तोडगा काढू शकतो असे लोकांना वाटते. आधीही असे प्रसंग आले पण २०१९ च्या निवडणुकीत आपणच बहुमत मिळविले होते, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार