शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही RSSचं स्वागत आणि अभिनंदन करतो, कारण...; औरंगजेब वादाविषयी जितेंद्र आव्हाडांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:15 IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरएसएसचं अभिनंदन केलं आहे.

NCP Jitendra Awhad: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हा मुद्दा राजकीय चर्चेचा केंद्रस्थानी आला आहे. या मुद्द्यावरून नुकताच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात हिंसाचारही उफाळून आला. अशातच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी औरंगजेबाची कबर हा मुद्दा प्रासंगिक नसल्याचं सांगितल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आरएसएसने मांडलेल्या या भूमिकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरएसएसचं अभिनंदन केलं आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आरएसएसने मांडलेल्या या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. हीच भूमिका आम्ही मांडली असती तर टीका करणाऱ्यांची रांग लागली असती आणि औरंगजेब आमचा बाप असल्याचं त्यांनी सांगितलं असतं. पण महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला इथंच गाडला हे आमच्या छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणींच्या शौर्याचं प्रतिक आहे," असं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान,  मी आरएसएसचा कट्टर विरोधक असलो तरी औरंगजेबाचा मुद्दा सद्यस्थितीत प्रासंगिक नसल्याच्या त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आरएएस प्रवक्त्यांनी नेमकं काय म्हटलं?

औरंगजेब कबर वादाविषयी बोलताना आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर म्हणाले, "कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाज स्वास्थासाठी चांगला नाही. मला वाटतं की, पोलिसांकडून याची दखल घेतली जात आहे. ते याच्या मुळाशी जातील. औरंगजेब सध्याच्या स्थितीशी सुसंगत नाही", असं उत्तर आंबेकर यांनी दिलं. बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा २१ ते २३ मार्च दरम्यान होत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही सभा होत आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी संघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेकर यांनी ही भूमिका मांडली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNCPराष्ट्रवादी काँग्रेस