शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे आम्हाला हवेत; बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेना खासदार गजानन किर्तीकर असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 16:06 IST

पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा करा आणि युतीला मान्यता द्या असं म्हटलं होते. परंतु आता शक्यता कमी आहे असंही खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं. 

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर महाराष्ट्राची लूट करून सूरतेला जाणारे हे एकमेव आहे अशी टीका केली. त्याचसोबत उद्धव ठाकरे जातील तिथे सभा घ्यायला जाऊ नका, महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष द्या असा सल्ला दिला. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेची तूर्तास शिंदे-भाजपाशी जवळीक नाही असेच चित्र दिसून आले. त्यावरून शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी भाष्य केले आहे. 

खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, गुढीपाडवा मेळाव्याला मनसेची जाहीर सभा होती, त्यांचे स्वातंत्र्य अस्तित्व आहे. राजकारणात स्वातंत्र्य अस्तित्व टिकवायचे असेल तर त्या पक्षाच्या प्रमुखाला अशी भाषा बोलावी लागते. एकदम आम्ही भाजपा-एकनाथ शिंदेंकडे समर्पित झालोय असा अर्थ कुणी काढू नये. ही बोलणाऱ्यांची स्ट्रॅटर्जी आहे. ते आमच्यासोबत आहेत. आम्हाला ते हवेत असं त्यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरेंनी संधी गमावलीशिवसेनेत जे काही घडले त्याचं कुठल्याही शिवसैनिकाला दु:ख आहे. समेट झाला असता, पक्ष एकसंघ राहिला असता परंतु पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी योग्यवेळी जी पावले टाकायला हवी होती ती त्यांनी टाकली नाही. समेट व्हावा यासाठी आम्ही खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे समेट करा अशी मागणी केली होती. पक्ष एकसंघ ठेवा असं म्हटलं. भाजपासोबत युती नवीन नाही. मुख्यमंत्री शिवसैनिकाला केले हे तुम्ही स्वीकारा असं उद्धव ठाकरेंना सांगितले. पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा करा आणि युतीला मान्यता द्या असं म्हटलं होते. परंतु आता शक्यता कमी आहे असंही खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं. 

फडणवीस-ठाकरे एकोपा होईल असं नाही फडणवीस-ठाकरे हे दृश्य फार काही एकोपा होईल असं नाही. विधान भवनात येण्यासाठी एकच गेट आहे. त्यामुळे वाहने बाहेर उभी करून विधिमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत एकत्र यावे लागते. त्यावेळी अनेकदा नेते भेटतात. मग चर्चा करत संवाद साधत ते सभागृहापर्यंत जातात. त्यामुळे एकत्र येतील वैगेरे असे काही नसते असं सांगत खा. गजानन किर्तीकर यांनी देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित विधान भवनातील एन्ट्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे