वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

By Admin | Updated: July 1, 2016 01:55 IST2016-07-01T01:55:35+5:302016-07-01T01:55:35+5:30

येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) माध्यमिक स्कूलने वृक्षदिनाच्या पूर्वसंध्येला ५०० विद्यार्थ्यांचा समूह एकत्र करून वृक्षसंकल्प तयार केला.

We planted trees and trees | वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे


पिंपरी : येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) माध्यमिक स्कूलने वृक्षदिनाच्या पूर्वसंध्येला ५०० विद्यार्थ्यांचा समूह एकत्र करून वृक्षसंकल्प तयार केला.
सध्या समाजामध्ये वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृतीसाठी हा महासंकल्प केला आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या तुकोबारायांचे वृक्षसंवर्धनाचे स्वप्न साकारण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला.
या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शाळेच्या मैदानावर वृक्षसंकल्प तयार करण्यात आला. हा उपक्रम कला विभागाचे शिक्षक रमेश गाढवे व शिवराम हाके यांच्या संकल्पनेतून साकारला.
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. ‘प्रत्येकाने जीवन जगताना किमान एक तरी वृक्ष वाढवावा, अशी संकल्पना बुरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. त्यास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. या वेळी उपमुख्याध्यापिका परमजित कौर, पर्यवेक्षिका लता बिडकर यांचे सहकार्य लाभले.
वृक्षरचनेच्या मदतीसाठी शिवराम हाके, वंदना घांगुर्डे, अंजली गोरे, ज्योती गायकवाड, प्रताप पवार, अनिता भामरे, विजयालक्ष्मी महाजनी, हनुमान पोटे यांनी मदत केली.
(प्रतिनिधी)

Web Title: We planted trees and trees