शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...आम्ही एकत्रच येणार आहोत; प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांच्या भेटीवर मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 11:22 IST

इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुणे - Prakash Ambedkar on Sharad Pawar ( Marathi News ) राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त आले. त्या भेटीवर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केले आहे. आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत. त्यामुळे भेटीचा सिलसिला सुरू राहील असे सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. 

पुण्यात भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी प्रकाश आंबेडकर पोहचले होते. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांच्या भेटीवर प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकत्र येणारच आहोत, अनौपचारिक, औपचारिक कुठे ना कुठे, कधी ना कधी भेट होणारच आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात आता काही अर्थ राहिला नाही. ज्यावेळी आम्ही पत्र लिहित नव्हतो. इंडिया आघाडीत सहभागी करा. त्यात राष्ट्रवादीही आहे. शिवसेनाही आहे. त्यामुळे वारंवार भेटीगाठी होत राहणार आहे. भेट झाली तर निश्चितपणे आपल्याला सांगेल.

तर इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे.आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक सहमतीचा प्रश्न नाही. इंडिया आघाडीचा प्रश्न आहे. ज्यादिवशी आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालो त्यानंतर या पंतप्रधानांनी गेल्या १० वर्षात देशाला कसं खोकलं केलेले आहे याचा आराखडा आम्ही मांडू असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, सत्तेत येणे, संविधान वाचवणे हा आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. त्याचसोबत मराठा आणि ओबीसी समाजात जे भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते वाढणार नाही आणि त्यातून योग्य तोडगा निघेल. तसेच महाराष्ट्राची शांतता जशी आहे तशी राहिले हे पाहणे हादेखील आमचा नव्या वर्षाचा संकल्प आहे असं आंबेडकरांनी सांगितले. 

भाजपाचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी२०२४ या नव्या वर्षांत १८ व्या लोकसभा निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे वर्ष राजकीय धामधुमीचे राहणार आहे. लोकसभेवेळी काँग्रेस वा कोणताही विरोधी पक्ष एकट्याने भाजपचा वारू रोखू शकत नसल्याची जाणीव असल्याने २८ मित्रपक्षांनी एकत्र येत इंडिया महाआघाडीची स्थापना केली. या महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का याकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा