शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही विधानाशी सहमत नाही, मुंबई...; राज्यपालांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 13:07 IST

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी लोकांचा सहभाग जास्त आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

धुळे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासाच्या वाटचालीत मराठी माणसाचं श्रेय सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने प्रगती केली आहे. जगभरात मराठी माणसाचं नाव झालं आहे. राज्यपाल काय बोलले त्याबाबत ते खुलासा करतील परंतु आम्ही राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. 

धुळ्यात पत्रकारांना त्यांनी राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गुजराती, मारवाडी इतर समाज असेल वेगवेगळ्या समाजाचं योगदान नाकारता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठी लोकांचा सहभाग जास्त आहे.एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशोयोक्ती वापरली जाते. तसेच राज्यपाल बोलले असेल.  या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे हे राज्यपालांनाही माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

राज्यपालांचा खुलासा मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,” असं राज्यपाल म्हणाले. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचं खुलासा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला आहे. 

राज ठाकरेंचा इशारा‘मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपा