आपण तसे बोललोच नाही - मेहता

By Admin | Updated: June 26, 2015 02:27 IST2015-06-26T02:27:52+5:302015-06-26T02:27:52+5:30

दारू पिऊन लोक मेले त्याला काय करणार, असे विधान आपण केलेले नाही, असा खुलासा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केला आहे.

We did not talk like that - Mehta | आपण तसे बोललोच नाही - मेहता

आपण तसे बोललोच नाही - मेहता

मुंबई : दारू पिऊन लोक मेले त्याला काय करणार, असे विधान आपण केलेले नाही, असा खुलासा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मालवणी येथे विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना भेट दिली, त्या परिसराची पाहणी केली.
जखमींची पालिका इस्पितळात जाऊन चौकशी केली. तेव्हा विखे यांनी पालिका आयुक्त मेहता यांनी घटनास्थळी भेट का दिली नाही? अशी विचारणा केली होती. त्यावर ‘दारू पिऊन लोक मेले त्याला काय करणार?’ असे उत्तर आयुक्तांनी दिल्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यावर मेहता यांनी हा खुलासा केला आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: We did not talk like that - Mehta