शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीचा निकाल आमच्या बाजुने लागले अशी खात्री - महेश लांडगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:40 IST

Bullock Cart Race And Mahesh Landge : बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यासाठी चांगले वकील दिले आहेत.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत (Bullock Cart Race) आज सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर  (Supreme Court) सुनावणी होणार आहे. याबाबत घटनापीठ अंतिम निर्णय काय देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याच दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बैलगाडा शर्यतीचा निकाल आमच्या बाजुने लागले अशी खात्री असल्याचं म्हटलं आहे. तसेच आमच्या पाठीमागे ही फार मोठी ताकद आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही स्पर्धा व्यवस्थित पार पडेल हा विश्वास असल्याचं सांगितलं

बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यासाठी चांगले वकील दिले आहेत. वेगवेगळ्या राज्यांनीही याबाबत चांगले वकील दिले असून देवेंद्र फडणवीस यांनी यासगळ्यात विशेष लक्ष घातले. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून दाखल झालेल्या केसचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार नाही तर स्वत: देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

"आमच्या पाठीमागे ही फार मोठी ताकद आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही स्पर्धा व्यवस्थित पार पडेल हा विश्वास आम्हाला आहे त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल हा विश्वास आहे आमचे वकील, पशु विभागाचे लोक आले आहेत, जे जे राज्य सरकार म्हणून करता येईल ते सर्व आम्ही केलं आहे. या केसमध्ये वेळो वेळी सगळे अपडेटस हे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला देत आले आहेत" असं महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. 

एखाद्या स्पर्धेत गोळीबार झाला त्याचा येथे संबंध नाही, तिथं जी घटना घडली तिथं बैलगाडी शर्यत नाही तर वैयक्तिक वादातून ही घटना घडली. लोकांसमोर सत्य आलं पाहिजे. ही स्पर्धा सुरू राहण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय, कारण ही आपली परंपरा आहे असं देखील आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतMaharashtraमहाराष्ट्र