शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही रांगेतच अन् खरेदीची मुदत संपली, राज्यातील २.६६ लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनचे मोजमाप शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 09:43 IST

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने राज्यात ५६२ खरेदी केंद्र सुरू केले.

-सुनील चरपे नागपूर : राज्य सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत म्हणजेच शेतकऱ्यांकडे असलेल्या १४ लाख १३ हजार टन सोयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती. ६ फेब्रुवारीला या खरेदीची मुदत संपली. १५ ऑक्टोबर २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२५ या काळात राज्य सरकारकडून नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून ५ लाख ११ हजार ६५७ नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. असे असले तरी अद्यापही तब्बल २ लाख ६६ हजार १०० नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यात आले नाही.

२०२४-२५ च्या हंगामात सोयाबीनचे दर एमएसपीपेक्षा किमान एक हजार रुपये कमी आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने राज्यात ५६२ खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रांवर एकूण ७ लाख ७७ हजार ७५७शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यासाठी सरकारकडे नोंदणी केली. मात्र, अशातच खरेदीची मुदत संपल्याने शिल्लक राहिलेल्या सोयाबीनची खरेदी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खरेदीचा वेग संथच

सोयाबीन खरेदीचा वेग सुरुवातीपासून आजवर अतिशय संथ राहिला. त्यातच ३१ डिसेंबर २०२४ ला खरेदीची मुदत संपली. त्यापूर्वीच बारदाना नसल्याचे कारण सांगून खरेदी बंद करण्यात आली. खरेदीला ३१ जानेवारी आणि नंतर ६ फेब्रुवारी अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. या काळात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे असताना २.११ लाख टन सोयाबीन कमी खरेदी करण्यात आले. २ लाख ६६ हजार १०० शेतकऱ्यांकडील सोयाबीनचे मोजमाप शिल्लक असताना या खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे पणन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSoybeanसोयाबीनMarket Yardमार्केट यार्डMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार