शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 11:46 IST

बुडत्याला काडीचा आधार म्हणून संभाजी ब्रिगेडशी युती केली. संभाजी ब्रिगेडनं सामना ऑफिसवर दगडफेक केली होती. उद्धव ठाकरे काय आहेत हे संभाजी ब्रिगेडला एकदिवस कळेल असा टोला रामदास कदमांनी लगावला.

रत्नागिरी - बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी दिलीय. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे. त्यांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याचा अधिकार नाही. खरी शिवसेना कुणाची याबाबत न्यायदेवता निर्णय देईल. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी केला आहे. 

रामदास कदम म्हणाले की, शरद पवारांसारखी व्यक्ती या वयात राज्यात फिरून अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मातोश्रीत बसून राहिले. त्यांना इतरांना गद्दार म्हणण्याचा काय अधिकार? १९७० पासून मी शिवसेनेचं काम करतोय. मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने प्रेरित होऊन आम्ही काम सुरू केले. आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या. जेल भोगली. आदित्य ठाकरेंनी किती जेल भोगली? उद्धव ठाकरे ज्यावेळी म्हटले बाळासाहेब साधे होते, मी हुशार आहे. त्यादिवशी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर गादीवर बसले. त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे असं कदमांनी सांगितले. 

त्या रामदास कदमांना दीड वर्ष भेटले नाही शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब माझ्या कांदिवलीतील गणपतीला नेहमी दर्शनाला यायचे. ज्यावेळी माझ्याकडून चांगले काम व्हायचे तेव्हा मोठे साहेब पाठ थोपटायचे. एकदा संध्याकाळी साडेआठची वेळ होती. राहुल बजाज हे बाळासाहेबांसोबत होते. तेव्हा मी पोहचलो. तेव्हा बजाज यांना माझी ओळख करून देताना साहेब म्हणाले, नारायण राणे, राज ठाकरे जाने के बाद मेरी शिवसेना इसने बचायी असं साहेबांनी माझी ओळख करून दिली. आणि त्याच रामदास कदमांना दीड वर्ष उद्धव ठाकरे भेटत नाही अशी खंत कदमांनी व्यक्त केली. 

आम्ही तोंड उघडले तर तुमचे सगळे खोके बाहेर पडतील बुडत्याला काडीचा आधार म्हणून संभाजी ब्रिगेडशी युती केली. संभाजी ब्रिगेडनं सामना ऑफिसवर दगडफेक केली होती. उद्धव ठाकरे काय आहेत हे संभाजी ब्रिगेडला एकदिवस कळेल. केवळ वापरून घेतोय. माझा अनुभव ५२ वर्षांचा आहे. मी ३२ वर्ष आमदार आहे. अनेक मंत्रिपदे बाळासाहेबांनी दिली. मी मंत्रिपदासाठी आलो नाही. दिलं तरी मी नाकारेन. माझ्या आयुष्यात मी स्वत:वर कधी डाग लावून घेतले नाही. आम्ही तोंड उघडू तेव्हा तुमचे सगळे खोके बाहेर पडतील असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे. 

आता ती वेळ निघून गेलीमहाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येतायेत. गणपती झाल्यावर अनेक जण आमच्यासोबत घेतली. आम्हीच शिवसेना आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. ४० लोक बाजूला गेले नसते तर बाळासाहेबांची शिवसेना वाचली नसती. केवळ मातोश्रीवर खोक्याचं राजकारण झाले असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मशीन आहे की माणूस कळत नाही. सातत्याने लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. उद्धव ठाकरेंना भेटायला वेळ नव्हता. फक्त ४-५ बडवे होते. आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची ती वेळ निघून गेली असंही रामदास कदमांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे