शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: 'मिशन महाराष्ट्र'साठी आम्हीही तयार! शरद पवारांचे भाजपला प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 09:25 IST

तृणमूल काँग्रेसने ऐनवेळेस गोव्याच्या निवडणुकीत सहभाग घेतला. अन्य पक्षाचे लोक घेऊन निवडणूक लढवणे त्यांनी टाळले असते तर बरे झाले असते, असेही पवार म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘यूपी तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा देणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाराष्ट्र तैयार है’ अशा शब्दात उत्तर दिले आहे. तर, संसदेच्या आगामी अधिवेशन काळात दिल्लीत विरोधी नेत्यांशी चर्चा केली जाईल. आगामी काळात एकत्र येण्याबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असेही पवार म्हणाले.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना पवार म्हणाले की, पंजाबचा निकाल काँग्रेस पक्षाला एकप्रकारे झटका देणारा आहे. ‘आप’ या अलीकडे बनलेल्या राष्ट्रीय पक्षाने दिल्लीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या प्रकारो यश संपादन केले आणि ज्यापद्धतीचे प्रशासन दिले त्याला दिल्लीकरांनीही पसंती दिली. आपने दिल्लीत केलेल्या कामाचा परिणाम हा पंजाबमध्येही झाला. या आधी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वातील सरकार होते. मात्र, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षासोबत लढण्याच्या त्यांच्या निर्णयाचा लोकांवर नकारात्मक प्रभाव पडला. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचा केंद्र सरकारविरूद्ध जो राग होता तो मतदानात दिसल्यामुळे त्यांनी आप पक्षाला संधी दिली.

उत्तर प्रदेशात बहुमत जरी मिळाले नसले तरी समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात आपला जम बसवला आहे, हे दिसून आले. तृणमूल काँग्रेसने ऐनवेळेस गोव्याच्या निवडणुकीत सहभाग घेतला. अन्य पक्षाचे लोक घेऊन निवडणूक लढवणे त्यांनी टाळले असते तर बरे झाले असते, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा