शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 06:18 IST

परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.

मुंबई /पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात २.१२ टक्के वाढ झाली आहे. परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.६,९८६ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ५८१ म्हणजेच ९४.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४० हजार ७९५ खासगी विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ९८८ (८५.७६%), तर ४५ हजार ०८३ पुनर्परीक्षार्थींमधून २२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तनिषा बाेरामणीकर हिने ६०० पैकी ६०० गुण घेत बारावीच्या निकालात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तनिषाला लेखी परीक्षेत ६०० पैकी ५८२ गुण आणि खेळाचे १८ गुण असे एकूण ६०० गुण मिळाले. १०० टक्के घेणारी तनिषा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकमेव असल्याचेही स्पष्ट झाले.

नाउमेद होऊ नका; पुन्हा परीक्षेची तयारी करापुणे : बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन. जे विद्यार्थी यशस्वी झाले नाहीत त्यांनी नाउमेद हाेऊ नये. ही परीक्षा म्हणजे जीवनाची अंतिम परीक्षा नाही त्यामुळे निराश न हाेता पुढील परीक्षेसाठी चांगली तयारी करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले.यंदा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेचे गुण ओएमआर शीटवर न घेता ऑनलाइन पोर्टलद्वारे घेतल्याने निकाल लवकर जाहीर करता आल्याचे ते म्हणाले.

मुंबईचा निकाल ३.८२ टक्क्यांनी वाढला तरी... इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागीय मंडळाचा बारावीच्या निकाल सर्वांत तळाला असला तरी त्यामध्ये ३.८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षी ८८.१३% असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५% आहे.

यंदाही मुलींचीच बाजीराज्यात बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९५.४४, तर मुलांचे ९१.६० टक्के आहे. मुलींचा निकाल ३.८४ टक्के जास्त आहे.

विद्यार्थ्यांना किती गुण? ८,७८२     ९०% १,९०,५७०    ७५% ४,८०,६३१    ६०% ५,२६,४२५    ४५% १,३२,०५८    ३५ ते ४५% 

बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थीमुले : ७,६६,६५१उत्तीर्ण : ७,०२,२९६मुली : ६,५७,३१९उत्तीर्ण ६,२७,३८८

३१३ कॉपी प्रकरणांची नाेंद nपरीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी ३१३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक १४३ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर मंडळात घडली आहेत. nयासह १३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लेखन केल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात २१ कनिष्ठ महाविद्यालये आणि संस्थांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. 

बारावीच्या निकालात कोकण विभाग राज्यात पहिला, तर मुंबई शेवटून पहिलाकोकण    ९७.५१ नाशिक    ९४.७१ पुणे    ९४.४४ कोल्हापूर    ९४.२४ छत्रपती संभाजीनगर    ९४.०८ अमरावती    ९३.०० लातूर    ९२.३६ नागपूर    ९२.१२ मुंबई    ९१.९५ 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी