शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

विसर्जनाच्या वाटेवर आता देखाव्यांची चलती, सांस्कृतिक कार्यक्रमांना अोहोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 13:18 IST

अद्यापही पुण्याच्या गणेशदेखावेंची गंमत-उत्सुकता कायम आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कमी कमी होत चाललेत. कलावंतांचे वाढत चाललेले दर, त्यांचं सांभाळावं लागणारं वेळापत्रक यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी दिव्यांच्या झगमगाटातील देखाव्यांकडेच अलीकडे कल आहे.

ठळक मुद्दे'विसर्जन' होण्याच्या क्षणी भावूक व्हायला होई. लाईट मंदावणार, स्पीकर थंडावणार, खिरापतींच्या खादाडीची मजा संपणार यामुळे कसंनुसं व्हायला होई.सिटी पोस्ट चौकात दगडुशेठ मिरवणूक आधी येते की, मंडई गणपती याची उत्सुकता असे. मानाची बॅंडपथकं, मानाच्या गणपतींची देखणी सजावट अनुभवण्यासाठी उत्तररात्री घरातून निघून मिरवणूक रस्त्यावर येणं होत असे.त्या त्या गावातले व्हीआयपी रसिक आठवत राहतात. गोव्यात मंडपात आमचा कार्यक्रम ऐकायला आवर्जून उपस्थित राहाणारे, सतरंजीवर लेंगा-शर्टात मांडा ठोकून बंदोबस्ताशिवाय येणारे पर्रीकर साहेब आठवतात.

- सुधीर गाडगीळ

'विसर्जन' होण्याच्या क्षणी भावूक व्हायला होई. लाईट मंदावणार, स्पीकर थंडावणार, खिरापतींच्या खादाडीची मजा संपणार यामुळे कसंनुसं व्हायला होई. बहुतेक वाड्यात विहीरी होत्या. विहीरीवरच आख्ख्या वाड्यातली मंडळी जमून कोरस आरत्यांचा धमाका करुन, 'मोरया' म्हणत विहीरीत 'श्रीं'ची मूर्ती विसर्जीत केली जात असे. सार्वजनिक गणपतींची मिरवणूक असे. आमच्या शनीपाराजवळच्या घरापासल्या रस्त्यावर अनंतचर्तुदशीच्या आदल्या रात्रीपासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गाड्यांची रांग लागत असे. सिटी पोस्ट चौकात दगडुशेठ मिरवणूक आधी येते की, मंडई गणपती याची उत्सुकता असे. मानाची बॅंडपथकं, मानाच्या गणपतींची देखणी सजावट अनुभवण्यासाठी उत्तररात्री घरातून निघून मिरवणूक रस्त्यावर येणं होत असे. मामा रासनेंच्या सुरेल आवाजाची मला ओढ असे ते दगडुशेठ मिरवणुकीच्या आगमनाची घोषणा करत असत. विशिष्ट विषयावरचे देखावे ही पुण्याच्या उत्सवाची शान होती. आमचे बाहेरगावचे नातेवाईक पुण्याचे गणपती देखावे बघण्यासाठी हमखास दोन रात्री पुण्यात हजेरी लावत. अद्यापही पुण्याच्या गणेशदेखावेंची गंमत-उत्सुकता कायम आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कमी कमी होत चाललेत. कलावंतांचे वाढत चाललेले दर, त्यांचं सांभाळावं लागणारं वेळापत्रक यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी दिव्यांच्या झगमगाटातील देखाव्यांकडेच अलीकडे कल आहे. मला मात्र अजूनही ते गावोगावचे रसिक, तो मॅटेडोरचा प्रवास, त्या त्या गावातले व्हीआयपी रसिक आठवत राहतात. गोव्यात मंडपात आमचा कार्यक्रम ऐकायला आवर्जून उपस्थित राहाणारे, सतरंजीवर लेंगा-शर्टात मांडा ठोकून बंदोबस्ताशिवाय येणारे पर्रीकर साहेब आठवतात. उत्तररात्री मिळणारं घरगुती चवीचं ठाण्यातल्या सावंतबाईंचं जेवण आठवतं. रात्रीच्या झोपेत, पुण्यात परतताना, मॅटेडोरच्या दारातून पडलेला तालवाद्यवादक दरेकर आठवतो आणि उत्तररात्री थकून गाढ झोपेत असलेल्या आम्हा मॅटेडोरमधल्या कलावंतांना 'ठाक-ठाक' करत जागे करुन, लायसन्स तपासायला जागे असणारे हवालदार आठवतात. सर्वात लक्षात आहे, ते म्हणजे बारामती जवळच्या एका दुधाच्या गावात रस्त्याच्या एका कडेला आमचं स्टेज, मधून रस्त्यावरुन वाहतूक आणि रस्त्याच्यापलिकडे वाहतुकीच्या व्यत्यत न समजता आमचं गाणं-बोलणं ऐकायला आत्मीयतेने जमणारे श्रोते!अमूकच माईक पाहिजे, इतकं मानधन हवं, एसी गाडी हवी, अशा कलावंतांच्या अटींच्या जगात अलीकडे असणाऱ्यांना त्या 'रस्त्यांवर' उत्साहाने केलेल्या 'शों'ची मजा काय समजणार ?

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव