पनवेलमध्ये गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना

By Admin | Updated: July 4, 2016 03:13 IST2016-07-04T03:13:59+5:302016-07-04T03:13:59+5:30

‘गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना’ असा हायटेक फंडा यावेळी पनवेलमधील प्रभाग रचनेत राबविण्यात येणार आहे.

Wave composition through Google Mapping in Panvel | पनवेलमध्ये गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना

पनवेलमध्ये गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना

वैभव गायकर,

पनवेल- वॉर्डरचनेत सुसूत्रता यावी, या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘गुगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना’ असा हायटेक फंडा यावेळी पनवेलमधील प्रभाग रचनेत राबविण्यात येणार आहे. पनवेल नगरपरिषदेच्या प्रभागरचनेत या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वॉर्डरचना करण्यात येणार आहे. आजपर्यंत निवडणूक प्रक्रियेसाठी असलेले नकाशे हे ढोबळमानाने केलेले होते. लवकरच या पद्धतीला व नकाशांना छेद देऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये गुगल मॅपिंगची प्रकिया सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मतदार यादीनुसार नकाशांचा अभ्यास सुरू असून मतदार यादीला योग्य तो नकाशा देण्याचे काम गुगल मॅपिंग प्रक्रि येद्वारे होणार आहे. पनवेलमध्ये लवकरच गुगल मॅपिंगचे ट्रेनिंग सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गुगल मॅपिंग अमलात आणण्याचे प्रयत्न होणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघ, तहसीलदार कार्यालयांतर्गत पनवेल नगरपालिका हद्द, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, उर्वरित ग्रामीण भागांचा समावेश आहे. शिवाय उरण तालुक्यातील ११० केंद्रे पनवेल तालुक्यात समाविष्ट आहेत.
एकंदरीत पाहता ५४७ केंद्रे ही पनवेल तालुक्यात येत असल्यामुळे गुगल मॅपिंग प्रक्रियेत अधिक वेळ जाण्याची शक्यता आहे.
>रायगड जिल्ह्यात गुगल मॅपिंग
संपूर्ण रायगड जिल्ह्यात गुगल मॅपिंग लागू करण्यात येणार आहे. या हायटेक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभागरचना करीत असल्याने निवडणूक कार्यालयाचा वेळ वाचणार आहे, तसेच मानवी हस्तक्षेप टळणार आहे.
प्रभाग रचना निश्चित करताना वाटेल त्या पद्धतीने नकाशे काढले जात होते. त्यात प्रभागाची हद्द निश्चित करण्यासाठी नदी, नाले, ओढे या नैसर्गिक हद्दीबरोबरच रस्त्याचा विचार केला जात असे, मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप करून हव्या त्या पद्धतीने प्रभाग रचना तयार करण्याचे प्रकार घडत होते.
त्यामुळे निवडणूक आयोगाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असे. हा प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने गुगल मॅपच्या आधारे संगणकीकृत पद्धतीने प्रभागरचना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकामधील संभ्रम कमी होणार
अनेक वेळा आपला प्रभागाची सीमा किती कोणती आहे, कोणत्या रस्त्यापासून, कोणत्या चौकापर्यंत तिचा विस्तार आहे. असे प्रश्न पडायचे. मात्र या प्रणालीमुळे प्रभागरचनेत पारदर्शकता येऊन नागरिकांचा संभ्रम कमी होईल.
याआधी २०११ च्या जनगणना आयोगाच्या नुसार प्रभाग रचना करण्यात आली होती. यावर्षी नकाशा, डाटा गुगल मॅपिंगवर अपलोड केल्यानंतर गुगल इमेज द्वारे प्रभाग रचना कारण्यात आली .
>गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनेमुळे जास्तीत जास्त पारदर्शकता येईल. नुकतीच पनवेल नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेत ही प्रणाली वापरण्यात आली. ७५०० लोकसंख्या असलेला असा स्वतंत्र प्रभाग तयार करण्यात आला. याकरिता त्या प्रभागांमधील माहितीची केएमएल फाईल तयार करून ती गुगल मॅपवर अपलोड करण्यात आली. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात आली.
- मंगेश चितळे , मुख्याधिकारी, पनवेल नगरपरिषद

Web Title: Wave composition through Google Mapping in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.