मुसळधार पावसानंतरही पाणीबाणी

By Admin | Updated: June 28, 2016 03:11 IST2016-06-28T03:11:07+5:302016-06-28T03:11:07+5:30

धो धो पाऊस पडत असून सुध्दा साखरे येथे टँकर ने पाणी पुरविले जाते.

Waterfall after heavy rains | मुसळधार पावसानंतरही पाणीबाणी

मुसळधार पावसानंतरही पाणीबाणी


मनोर : धो धो पाऊस पडत असून सुध्दा साखरे येथे टँकर ने पाणी पुरविले जाते. पाण्यासाठी पाणीबाणी सुरूच अशी परिस्थिती मनोर जव्हार रस्त्यावरील साखरे या गावात आहे.
त्यामुळे टँकरचे पाणी विहिरीत आणि विहिरीचे पाणी हंडयात अशी स्थिती आहे. गेल्या दोन दिवसापासून काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र काही गाव पाडयात पाऊस न पडल्याने आजही तेथील लोकांना पाणी टंचाईने ग्रासले आहे. ही स्थिती बदलणार कधी असा सवाल ग्रामस्थ करीत असून प्रशासन ढिम्म आहे.
(वार्ताहर)

Web Title: Waterfall after heavy rains