शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांसाठीचे पाणी २० टक्क्यांनी महागणार!

By यदू जोशी | Updated: September 15, 2017 05:15 IST

महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.

 मुंबई : महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांना जलसंपदा विभागाकडून पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या दरात १६ ते २० टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला दिला असून येत्या आठ दिवसांत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या गावांसाठीचे पाणीदर मात्र वाढणार नाहीत.प्राधिकरणाने वाढविलेल्या दरांचा बोजा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडेल आणि पर्यायाने तो ग्राहकांवर पडणार आहे.पाणीदर वाढल्याने लहानमोठ्या शहरांमधील पाणीपट्टीचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेल्या पालिकांना पाणीपट्टी (कर) वाढविण्याशिवाय पर्याय नसेल. त्यामुळे राज्यातील पाणी महागणार आहे.सध्या विविध प्रकारच्या पाणीपट्टीद्वारे जलसंपदा विभागाला दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळेल. सध्या विभागाला वार्षिक ६५० कोटी रुपये मिळतात. ते उत्पन्न वाढून ९५० कोटी रुपयांवर जाणार आहे. विभागाला वार्षिक १४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशा पद्धतीने पाणीदर निश्चित करण्याची विनंती विभागाने प्राधिकरणाला केली होती. मात्र प्राधिकरणाने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले. या आधी २०११ मध्ये जलसंपदा विभागाने पाणीदर वाढविले होते. त्यानंतरच्या सात वर्षांत चलनवाढ ५४ टक्के झाली असली तरी पाणीदरातील वाढ सरासरी २० टक्केच करीत असल्याचे समर्थन प्राधिकरणाने केले आहे.उद्योगांसाठी सध्या १० हजार लिटरमागे ३० ते ६० रुपये पाणीदर जलसंपदा विभागाकडून आकारला जातो.तो आता ४० ते ८० रुपये करण्यात येणार आहे.महापालिका व नगरपालिकांच्या शहरांत घरगुती वापराच्या पाण्यावरील आकार हा २० टक्के वाढविला जाईल. सध्या १० हजार लिटरमागे १ ते २ रुपये आकारणी केली जाते.शेतीसाठीच्या पाण्याचे दर १६ टक्के वाढणार आहेत. ग्राम पंचायतींच्या गावांमध्ये पुरविण्यात येणाºया पिण्याच्या पाण्याचा दर १० हजार लिटरमागे ४० पैसे इतका आहे. तो कायम राहील.बीअर, मिनरल वॉटर महागणारऔद्योगिक वापराच्या पाण्याचे दर सध्या १० हजार लीटरमागे ३० ते ६० रुपये आहेत. ते ४० ते ८० रुपये केले जाणार आहेत. मात्र हे करताना बीअर आणि मिनरल वॉटर उद्योगांसाठीच्या पाण्याचे दर त्यापेक्षा पाच ते सहापट आकारण्यात येणार आहेत. याचा अर्थ या दोन्ही उद्योगांकडून २०० ते ४०० रुपये आकारणी केली जाईल.

टॅग्स :WaterपाणीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार