पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By Admin | Updated: March 2, 2017 01:44 IST2017-03-02T01:44:01+5:302017-03-02T01:44:01+5:30

रावेत पंपिंग स्टेशनचे दुरुस्तीचे काम असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवारी संध्याकाळी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे

Water supply shut on Thursday | पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पाणीपुरवठा गुरुवारी बंद


पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील रावेत पंपिंग स्टेशनचे दुरुस्तीचे काम असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवारी संध्याकाळी करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे दिली आहे.
रावेतच्या पंपिंग स्टेशन येथे तातडीची दुरुस्तीची कामे असल्याने गुरुवारी ती करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा होईल. मात्र, संध्याकाळी होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. गुरुवारीच पाण्याचा साठा करून ठेवावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water supply shut on Thursday