शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

पाणीपुरवठ्यात कपात

By admin | Updated: November 20, 2014 01:08 IST

अर्ध्या नागपूरला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात उद्या, गुरुवारपासून कपात होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपूर्वी पेंचचा उजवा कालवा फुटल्यामुळे गोरेवाडा जलाशयातील पाण्याच्या पातळीत विक्रमी घट झाली,

गोरेवाड्याची पातळी वाढेना : दीड मीटरने कमीनागपूर : अर्ध्या नागपूरला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात उद्या, गुरुवारपासून कपात होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांपूर्वी पेंचचा उजवा कालवा फुटल्यामुळे गोरेवाडा जलाशयातील पाण्याच्या पातळीत विक्रमी घट झाली, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जलाशयात दररोजच्या गरजेपुरतेच पाणी उपलब्ध होत असल्याने येथून काही प्रमाणात कमी पंपिंग करून पाण्याची पातळी वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यामुळे पुढील आठ दिवस कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पेंचच्या उजव्या कालव्याद्वारे नागपूर शहरातील गोरेवाडा जलाशयात पाणी आणले जाते. ३१ आॅक्टोबरला पेंच नवेगाव खैरी प्रकल्पाच्या १९ कि.मी. अंतरावर राईट बॅक कॅनल पाटणसावंगीजवळ एका ठिकाणी फुटला होता. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी पुन्हा बाभुळखेडा गावाजवळ हा कालवा फुटला. दुरुस्तीसाठी सुरुवातीला तीन दिवस व नंतर तीन दिवस कालव्याद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे गोरेवाडा जलाशयातील पाण्याची पातळी ३१२.५० मीटरपर्यत खाली गेली. परिणामी गोरेवाड्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या पश्चिम, दक्षिण व मध्य नागपुुरातील वस्त्यांना बुधवारी काही प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. पुढील तीन-चार दिवस टंचाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. १७ नोव्हेंबर रोजी पेंचच्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, मध्ये तीन दिवस कालव्याद्वारे येणारे पाणी बंद होते व दुसरीकडे गोरेवाडा जलाशयात असलेल्या जलसाठ्यातून पूर्ण क्षमतेने नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे गोरेवाडा जलाशयाची पाण्याची पातळी खूप खाली गेली. येथून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी जलाशयात किमान ३१४ मीटर पातळी असणे आवश्यक आहे. पण ही पातळी तब्बल दीड मीटरने खाली गेली आहे. बुधवारी पातळी ३१२.५० मीटर होती. गुरुवारी त्यात थोडी सुधारणा होऊन ३१२.६५ मीटरपर्यंत वाढ झाली. गोरेवाडामधून एरव्ही दररोज शहराला ४३० ते ४४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सुमारे ४० ते ५० एमएलडी पाणी कमी पडत आहे. गोरेवाडा येथील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पुढील दोन- तीन दिवस येथून कमी पाणी पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही. गोरेवाड्यातून नेहमीपेक्षा कमी पाण्याची उचल केली व दुसरीकडे पेंचच्या कालव्याद्वारे येणारे पाणी साठवले तर दररोज सुमारे ५ सेंटिमीटरने पातळी वाढू शकते. त्यामुळे पाणी पुरवठ्यात काहीशी कपात करण्याचे नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)जलकुंभ भरेना, टँकरही रिकामे गोरेवाडा जलाशयातून पंपिंग करून पाणी सेमिनरी हिल्स परिसरातील राजभवन येथील जलकुंभात आणले जाते. नंतर येथून पश्चिम, दक्षिण-पश्चिम, मध्य व दक्षिण नागपुरातील जलकुंभांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गोरेवाड्यातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याने शहरातील जलकुंभ देखील पूर्णपणे भरले जात नाही आहेत. परिणामी जलकुंभांवरून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. जलकुंभावर असणाऱ्या हायड्रनवर टँकर भरले जातात. मात्र, नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी टँकरला देणाऱ्या पाण्यातही काहिशी कपात केली जात आहे.