पाणीकपातीमुळेटँकरची मागणी
By Admin | Updated: July 5, 2014 23:41 IST2014-07-05T23:41:25+5:302014-07-05T23:41:25+5:30
धरणांमधील पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने महापालिका प्रशासनाकडून शहरात एकवेळ पाणीकपात लागू करताच टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

पाणीकपातीमुळेटँकरची मागणी
पुणो : धरणांमधील पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने महापालिका प्रशासनाकडून शहरात एकवेळ पाणीकपात लागू करताच टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेने कपात लागू केल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत शहरात सुमारे 3 हजार 70 टँकरच्या फे:या झालेल्या आहेत. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास महिन्याभरात टँकरच्या फे:यांची संख्या पंधरा हजारांहून अधिक होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये अवघा एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात 29 जूनपासून 12 टक्के पाणीकपात लागू केली असून, एकवेळ पाणी देण्यात येत आहे.
मात्र, पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे शहराच्या अनेक भागांत कमी दाबाने तसेच कमी वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली असून, गेल्या सहा दिवसांत सुमारे 3 हजार 70 टँकरच्या फे:या झाल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यात पर्वती, पद्मावती, पटवर्धनबाग, चतु:शृंगी, संगमवाडी, वडगाव, तसेच रामटेकडी टँकर भरणा केंद्रांतून हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
जीपीएस यंत्रणा; 21 जुलैर्पयतची मुदत
4पाणीपुरवठय़ाचे टँकर हद्दीबाहे जात असल्याने त्यास आळा घालण्यासाठी खासगी टँकरमालकांनी जीपीआरएस बसविण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. ही यंत्रणा नसेल तर टँकरसाठी पास देण्यात येणार नसल्याची भूमिका पालिकेने घेतलेली आहे.
4मात्र, ही यंत्रणा तत्काळ बसविणो शक्य नसल्याने टँकरचालकांनी केलेल्या मागणीनुसार, त्यांना पालिका प्रशासनाकडून 21 जुलैर्पयतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर यंत्रणा न बसविल्यास पासचे वाटप पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
गेल्या 6 दिवसांतील फे:या
तारीखटँकर फे:या
29 जून397
3क् जून495
1 जुलै55क्
2 जुलै537
3 जुलै511
4 जुलै557
अडेलतट्टंची चंगळ
4शहरात मागणी वाढत असल्याने टँकरचालक-मालकांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे अडल्या नाडलेल्यांची अडवणूक करीत दुप्पट तिप्पट किंमत घेत टँकर देणा:यांचीही संख्या पर्यायाने वाढणार आहे.