पेण खारेपाटात पाणीटंचाईची समस्या
By Admin | Updated: March 2, 2017 03:10 IST2017-03-02T03:10:08+5:302017-03-02T03:10:08+5:30
१४ ग्रामपंचायतींमधील २८ गावे ३४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणारी भीषण पाणीटंचाई ही फार मोठी समस्या आहे.

पेण खारेपाटात पाणीटंचाईची समस्या
पेण : पेणच्या वाशी खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २८ गावे ३४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणारी भीषण पाणीटंचाई ही फार मोठी समस्या आहे. या समस्यापूर्ततेसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींवर पाणीप्रश्नामुळे तब्बल २५०० ग्रामस्थांनी बहिष्कार टाकू न आपला निषेध नोंदविला. ज्या शेकापला अडचणीत आणण्यासाठी ही राजकीय चाल खेळली होती. तीच खेळी विरोधकांवर बुमरँग होऊन विरोधकांनाच पाणी पाजण्यात शेकाप उमेदवार यशस्वी ठरले. ‘जो जिता वोही सिकंदर’ या नात्याने पेण खारेपाटाला टँकरमुक्त करणे हे शिवधनुष्य शेकापला पेलावे लागणार आहे.
पेणमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकालात पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर सगळीकडे शेकापचे उमेदवार निवडून आले. पंचायत समितीच्या सभापती म्हणून स्मिता पेणकर या अनुसूचित जमाती आरक्षणच्या उमेदवार म्हणून निवडून आल्यात. त्यामुळे पंचायत समितीवर ७ सदस्यांसह एकहाती वर्चस्व शेकापने राखले. पंचायत समितीच्या मार्फत खारेपाटाला दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. दरवर्षी ५० ते ५५ लाखांची तरतूद टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी होते. पेण पंंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा तब्बल एक ते सव्वा कोटींच्या घरात असतो. मात्र, खरी टंचाईची झळ वाशी वडखळ खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २७ गावे व ३४ वाड्यांना बसतो. त्यामुळे टंचाईच्या या आव्हानाचा सामना शेकापच्या नेत्यांनाच करावा लागणार आहे.
३० कोटींची हेटवणे-शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या १५ कोटींच्या वर रकमेची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली आहे. या १५ कोटींतून हेटवण्याचे पाणी शहापाडा धरणात पडणार. मात्र, त्यानंतरच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण प्रणालीवर शेकाप नेत्यांनी विशेष लक्षपूर्वक असे नियोजक केले. त्या निधीची पूर्णता व प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यांची प्रभावी अंमलबजावणी तातडीने व्हावी. तसे झाले नाही तर मात्र टँकरमुक्त खारेपाट हा तसाच राहील. शेवटी पेणमधील सर्वसत्ताधीश म्हणून शेकापच बाजीगर ठरलाय. (वार्ताहर)
दरवर्षी ५0 ते ५५ लाखांची तरतूद
दरवर्षी ५० ते ५५ लाखांची तरतूद टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी होते. पेण पंंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा तब्बल एक ते सव्वा कोटींच्या घरात असतो.
खरी टंचाईची झळ वाशी वडखळ खारेपाटातील १४ ग्रामपंचायतींमधील २७ गावे व ३४ वाड्यांना बसतो. त्यामुळे टंचाईच्या या आव्हानाचा सामना शेकापच्या नेत्यांनाच करावा लागणार आहे.
या त्रासातून सुटका करावी अशी नागरिकांची सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा आहे.