शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच, पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 03:15 IST

पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या ...

पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या दुष्काळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्यछायेच्या भागाला जलयुक्त केले आहे. गोदावरीने औरंगाबाद विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात प्राण फुंकले आहेत. जायकवाडीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील बºयाचशा भागाला दिलासा मिळाला आहे.राज्यात झालेल्या विषम पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर व साताºयाला पुराच्या पाण्याचा फटका बसला. भीमा नदीच्या खो-यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ११७.४७ अब्ज घनफूट क्षमतेचे राज्यातील सर्वात मोठे उजनी धरण भरले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यात पूर आला. कृष्णा खोºयात झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर व साताºयात पुराने थैमान घातले.विदर्भ मराठवाड्यात पेरणी रखडलीराज्यातील मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पेरणी झालेली नाही. मराठवाड्याच्या अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात क्षमतेच्या २९ व औरंगाबादला ४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी वाण धरणात २.१९ (७५.८८ टक्के), ऊर्ध्व वर्धा ९.३५ (४७ टक्के), इसापूर ५.०३ (१४. ८ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात ७०.१५ टीएमसी (९१.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.गोदावरी खोºयात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. येलदरी धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता २८.५०, निम्न मनार ४.८८ व निम्न तेरणा धरणाची क्षमता ३.२२ टीएमसी आहे. मात्र धरणांत सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे.१९ आॅगस्ट अखेरचा उपयुक्तपाणीसाठा टीएमसीमध्ये -विभाग साठा आजची गेल्यावर्षीची(टीएमसी) टक्केवारी टक्केवारीअमरावती २८.३२ २७.८९ ४३.३औरंगाबाद ७९.५९ ३०.५८ १९.३२कोकण १०६.७६ ८६.१४ ८९.७५नागपूर ६३.६८ ३९.१५ ४०.३१नाशिक १२७.९५ ६०.३५ ५६पुणे ४५५.४९ ८४.८ ७९.५६एकूण ८७४.७९ ६०.५८ ५७.९८भीमा-कृष्णा खोºयातील प्रमुखधरणातील साठा टीएमसीतधरण टीएमसी टक्केवारीकोयना ९४.९३ ९४.८२धोम १०.९५ ९३.९६वारणावती २५.५८ ९२.९५दूधगंगा २२.९५ ९५.७२ऊरमोडी ९.४० ९७.४२डिंभे १२.४२ ९९.४३पवना ८.४६ ९९.४४मुळशी १८.४६ १००वरसगाव १२.८२ १००पानशेत १०.६५ १००निरा देवघर ११.७३ १००भाटघर २३.५० १००वीर ९.३४ ९९.२८उजनी ५३.५७ १००

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDamधरण