डोंगस्तेचे पाणी वापरणार

By Admin | Updated: July 4, 2016 03:56 IST2016-07-04T03:56:25+5:302016-07-04T03:56:25+5:30

कुडूसजवळ डोंगस्ते बंधारा आहे. त्यातील पाणी पडून आहे.

The water of the mountains will be used | डोंगस्तेचे पाणी वापरणार

डोंगस्तेचे पाणी वापरणार


कुडूस : कुडूसजवळ डोंगस्ते बंधारा आहे. त्यातील पाणी पडून आहे. म्हणजे एकीकडे आसपासची गावे पाण्यासाठी तरसत असताना हा पाणीसाठा पडून आहे त्याचे नियोजन व्हावे ते वापरले तर मोठ्या प्रमाणात जमीन सिंचनाखाली येऊन उरलेले पाणी आसपासच्या अनेक गावपाड्यांना पिण्यासाठी देता येईल. त्यासाठी अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनाही राबविता येईल.हे कधी होणार असा प्रश्न येथे आयोजिलेल्या लोकमत आपल्यादारी मध्ये करण्यात आला. त्यावर आमचा गाव आमचा विकास या अंतर्गत आपण ग्रामसभेत तसा प्रस्ताव मंजूर करून माझ्याकडे द्या मी तो मार्गी लावतो, असे आमदारांनी सांगितले.
वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले असूनही महावितरणचे खांब, वीजवाहक तारा तसेच रोहीत्र यांची अवस्था अत्यंत दारूण आहे. तिची दुरूस्ती करणे गरजेचे आहे हे कधी होणार? असा प्रश्न केला असता महावितरणचे अभियंता वैभव दामले यांनी याबाबतचे टेंडर मंजूर झाले असून लवकरच त्याचे काम सुरू होईल अशी माहिती दिली.
या तालुक्यात उत्तम क्रीडापटू आहेत परंतु, त्यांच्यासाठी क्रीडासंकुल नाही त्याकरीता जागादेखील आहे ते कधी होणार? असा प्रश्न विचारला गेला असता या जागेचा सातबारा आहे काय? असा प्रश्न आमदारांनी केला त्यावर होकारार्थी उत्तर आल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मी तयार करून पाठवतो असे स्पष्ट केले.
विंचू आणि सर्पदंशाचे रुग्ण ग्रामीण भगात खूप आहेत. मग त्या परिसरातील आरोग्य उपकेंद्रात त्याच्या लसी का नसतात? प्रतिबंधात्मक इंजेक्शन्स का नसतात. एक तर रस्ते धड नाही, अ‍ॅम्ब्युलन्स धड नाही, असली तर उपलब्ध होत नाही. इकडून तिकडे तिकडून इकडे अशा पळापळीत रुग्णाचा जीव जातो त्यामुळे ही औषधे प्रत्येक आरोग्य केंद्रात ठेवा, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले. तर आयोजन लोकमतचे वार्ताहर वसंत भोईर यांनी केले होते. हा कार्यक्रम चिंचघर रोडवरील ह.वि. पाटील विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. (वार्ताहर)

Web Title: The water of the mountains will be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.