IPL बंद करून राज्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही - सत्यजित भटकळ
By Admin | Updated: April 14, 2016 18:08 IST2016-04-14T17:25:51+5:302016-04-14T18:08:46+5:30
ज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद रून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, असे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले.

IPL बंद करून राज्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही - सत्यजित भटकळ
>ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १४ - राज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद करून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, खरा प्रश्न तर वेगळाच आहे, असे मत दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी अभिनेते, उद्योगपती व काही संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यात अभिनेता आमिर खानचाही समावेश आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने 'पाणी फाऊंडेशन'ची स्थापना केली असून आहे. यामध्ये आमिरसह सत्यमेव जयते’चे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांचाही सहभाग असून आज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आमिरसह बोलतना सत्यजित यांनी पाणी प्रश्नावर मत मांडले.
राज्यात भीषण दुष्काळ असताना आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने बीसीसीआयला जाब विचारत ३० एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचा आदेश दिला होता. लोकांना प्यायला पाणी नसताना तुम्ही पाण्याची नासाडी कशी करू शकता असा सवालही न्यायालयाने विचारला.
या मुद्यावरून अद्याप वाद सुरू असतानाच सत्यजित भटकळ यांनीही आपले मत व्यक्त केले. ' मी काही आयपीएलचा फार मोठा चाहता वगैरे नाही, पण आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवून आपला पाण्याचा प्रश्न सुटेल असे मला वाटत नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न आणि लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. सामने बाहेर खेळवून राज्यातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल. आयपीएल हे सॉफ्ट टार्गेट आहे' असे भटकळ म्हणाले.