शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अशी केली माढाने बारामतीवर सरशी ;जाणून घ्या पडद्यामागच्या घडामोडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:29 IST

नीरा देवघरच्या पाण्यावरुन बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघातील नेत्यांची सुरु असलेल्या रस्सीखेची मधे अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी  बाजी मारत बारामतीतून नीरेचे पाणी पळवून नेले.

पुणे : नीरा देवघरच्या पाण्यावरुन बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघातील नेत्यांची सुरु असलेल्या रस्सीखेची मधे अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी  बाजी मारत बारामतीतून नीरेचे पाणी पळवून नेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोचलेले कान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली शिष्टाई अपुरी पडली. भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आपले राजकीय वजन वापरत सोलापूरच्या पारड्यात नीरेचे संपूर्ण पाणी टाकण्यात यश मिळविले. आघाडी सरकारच्या काळात २००७साली नीरा कालवा पाणी वाटप करार करण्यात आला. नीरा उजवा कालव्याचे काम अपूर्ण असल्याने नीरा डावा कालव्याला या धरणातील ६० टक्के आणि उजवा कालव्याला चाळीस टक्के पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. डावा कालव्याद्वारे बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्याला पाणी मिळते. तर, उजवा कालव्याद्वारे माढा मतदार संघातील माळशिरस, फलटण आणि सांगोला भागाला पाणी मिळते. त्यातही माळशिरस आणि फलटणला त्याचा फायदा अधिक होतो. हा करार २०१७ साली संपुष्टात आला. जलसंपदा विभागाने राज्य सरकारला पुर्वीच्या करारास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बारामतीला बेकायदेशीर पाणी दिले जात असल्याचा दावा करीत पुर्वीच्या कराराला मुदतवाढ देऊ नये अशी मागणी सरकारकडे केली. तसेच, जलसंपदा मंत्र्यांनी देखील करार बदलाचे संकेत दिले होते. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, कोणत्या प्रश्नावर राजकारण करताय असा सवाल उपस्थित करीत सरकारचे कान देखील टोचले होते. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार निंबाळकर यांनी १० जूनला सिंचनभवन येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र भेट घेतली. आपापल्या मतदारसंघातील पाणी प्रश्नावर चर्चा केली. सुळे यांनी तर, नीरा देवघर धरणातील पाणी बंद पाईपलाईन मधून नेण्याचे सर्वेक्षण सुरु करण्याची मागणी देखील केली होती. त्यामुळे कोणकोणत्या ग्रामपंचायतींना फायदा होईल, याचा ताळेबंदही मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर नीरा-देवघरच्या पाण्यावर काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागले होते. सरकारने खासदार निंबाळकर यांची बाजू उचलत त्यांना ‘जल’बळ देऊ केले आहे. त्यामुळे तूर्तास तरी माढाने बारामतीवर सरशी केल्याचे चित्र आहे.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारWaterपाणीBaramatiबारामतीmadha-pcमाढाPoliticsराजकारण