नौदलाच्या दोन नौकांना जलसमाधी
By Admin | Updated: July 20, 2016 07:13 IST2016-07-20T06:04:51+5:302016-07-20T07:13:00+5:30
मुंबईतील नौदल डॉकयार्ड जवळच्या समुद्रात नौदलाच्या दोन गस्ती नौकांना मंगळवारी पहाटे जलसमाधी मिळाली

नौदलाच्या दोन नौकांना जलसमाधी
मुंबई : मुंबईतील नौदल डॉकयार्ड जवळच्या समुद्रात नौदलाच्या दोन गस्ती नौकांना मंगळवारी पहाटे जलसमाधी मिळाली. त्यांना मध्यरात्री आग लागली होती. कोणी जखमी झाले नसल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली.
सोमवारी मध्यरात्री १च्या सुमारास एका नौकेला आग लागली. बाजूलाच उभ्या असलेल्या दुसऱ्या गस्ती नौकेलाही झळ पोहोचली आणि दोन्ही नौकांनी पेट घेतला. नौदलाच्या जवानांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, नौकांची मोठी हानी झाल्याने त्या बुडाल्या. या घटनेची गंभीर दखल घेत त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. दोन्ही नौका २०१४साली नौदलाच्या ताफ्यात आल्या होत्या. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. याचा चौकशी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)