चोरट्याच्या गोळीबारात रखवालदारचा मृत्यू

By Admin | Updated: November 14, 2016 13:53 IST2016-11-14T13:55:00+5:302016-11-14T13:53:06+5:30

वाघोली येथील टीसीआय कंपनीच्या गोडाऊनमध्य़े रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या शिवाजी सदाशिव काजळे याच्यावर गोळीबार करुण खून करण्यात आला.

The watchman's death in the thief's firing | चोरट्याच्या गोळीबारात रखवालदारचा मृत्यू

चोरट्याच्या गोळीबारात रखवालदारचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत                   

पुणे, दि. 14 - वाघोली येथील टीसीआय कंपनीच्या गोडाऊनमध्य़े रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या शिवाजी सदाशिव काजळे याच्यावर गोळीबार करुण खून करण्यात आला. काजळे आणि त्यांचे सहकारी जे पी पांडे यांना मिठाई तुन गुंगीचे औषध देण्यात आले होते. गुंगीचे औषध देण्याबरोबर गोडाऊनचे सीसीटीव्ही देखील हल्लेखोरांनी तोडले. गुंगीचे औषध दिल्यानंतर काजळे याच्या बंदूकीतून गोलीबार करून उजव्या बाजुला हत्यराने वार देखील केला आहे. ख़ून करून हल्लेखोर पसार झाले आहे. चोरीच्या उद्देशाने हल्लेख़ोरांनी सुरक्षा रक्षकाला ठार केले असले तरी परिसरातील इतर सुरक्षा रक्षक जागरूक झाल्याने हल्लेखोर फ़रार झाले आहेत. ख़ून वैयक्तिक वादातून झाला आहे की चोरीच्या उद्देशाने झाला आहे, याचा तपास लोनिकंद पोलीस करत आहेत. 

Web Title: The watchman's death in the thief's firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.