वृत्त वाहिन्यांवर पाहा लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा

By Admin | Updated: August 27, 2016 05:22 IST2016-08-27T05:22:53+5:302016-08-27T05:22:53+5:30

मान्यवरांचा सहभाग आणि उपस्थितीने रंगलेला लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा आजपासून विविध वृत्त वाहिन्यांवर पाहता येणार आहे.

Watch news channels Lokmat Legislature Award ceremony | वृत्त वाहिन्यांवर पाहा लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा

वृत्त वाहिन्यांवर पाहा लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा


मुंबई : मान्यवरांचा सहभाग आणि उपस्थितीने रंगलेला लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा आजपासून विविध वृत्त वाहिन्यांवर पाहता येणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अभ्यासू आमदारांना पुरस्कृत करणारा आर.आर. पाटील फाउंडेशन प्रस्तुत लोकमत विधिमंडळ पुरस्काराचा दिमाखदार सोहळा नुकताच अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अभिनेते प्रशांत दामले यांनी घेतलेली नारायण राणे, दिलीप वळसे-पाटील, गिरीश महाजन, जयंत पाटील आणि आ. दिलीप सोपल या दिग्गज नेत्यांची मुलाखत, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूत्रसंचालनात रंगलेला महिला आमदारांचा परिसंवाद, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची प्रकट मुलाखत, मान्यवरांचा परिसंवाद आता वृत्त वाहिन्यांवर पाहता येईल.
>प्रक्षेपणाचे वेळापत्रक
आयबीएन लोकमत : २७ आॅगस्ट (शनिवार) दु. ४ वाजता
एबीपी माझा : २८ आॅगस्ट (रविवारी) दु. ४ वाजता

Web Title: Watch news channels Lokmat Legislature Award ceremony