शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

VIDEO: फडणवीस म्हणाले तुम्ही ७-७ टर्म असाल, पण...; आक्रमक अजित पवारांचा माईक एका मिनिटात बंद! पाहा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 14:10 IST

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी

नागपूर- 

राज्यात आज एका बाजूला ७ हजारहून अधिक ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना आणि निधीला स्थगिती देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जुंपली. विधानसभेत गदारोळ झाला मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना बसण्याची विनंती केल्यानंतर वाद शमला. 

अजित पवार बरसले...विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर झालेल्या अनेक कामंना स्थगिती दिल्याचा दावा केला. यावरुन सभागृहात विरोधकांनी एकच हल्लाबोल केला.  "बजेटमध्ये मंजूर झालेली कामं होती, ही महाराष्ट्रातील कामं आहेत. ही काही कर्नाटक आणि गुजरातची कामं नाही", असा असा हल्लाबोल अजित पवारांनी केला. तसंच आम्ही अनेक सरकारं बघितली, मनोहर जोशी, नारायण राणेंचं सरकार बघितलं, देवेंद्रजी तुमचंही सरकार ५ वर्ष बघितलं. सरकार येतात-जातात, तुमची पहिली टर्म आहे, पण आमच्या सात-सात टर्म झाल्या आहेत. पण अशी मंजूर झालेली व्हाईट बूक झालेली कामं कधी थांबली नव्हती", असा घणाघात अजित पवारांनी केला.

राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच...

अजित पवारांनी सरकारला धारेवर धरलं असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत प्रश्नोत्तराचा तास सुरू असल्याचं लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. "सन्माननीय विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुद्दा लक्षात आला आहे. तुमच्या मुद्द्याची नोंद घेतली आहे. प्रश्नोत्तराचा तास आहे. आता दोन मिनिटं खाली बसा, आपण कामकाज चालवूया", असं राहुल नार्वेकर म्हणाले. 

अजित पवार संतापले...राहुल नार्वेकर अजित पवारांना बसण्याची विनंती करत होते. पण अजित पवार यांनी सरकारवर टीका करणं सुरूच ठेवलं. "अध्यक्ष महोदय हा प्रश्नोत्तराचा तास आहे. आम्हाला प्रश्न विचारण्याचा आणि आमचा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे", असं अजित पवार म्हणाले. अध्यक्ष विनंती करत असतानाही अजित पवार खाली न बसल्यानं त्यांचा माईक बंद करण्यात आला होता. 

फडणवीस म्हणाले...तुमच्याकडूनच शिकलो!"विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुद्दा मांडला, पण मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही सात-सात वेळा निवडून आले असाल, आम्ही कमी निवडून आलो. पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी तुम्ही आमची सगळी कामं रोखली, माझ्या मतदारसंघातील कामं तुम्ही रोखली. अनेक वर्ष भाजपच्या लोकांना नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही", असं फडणवीस म्हणाले. 

ज्या स्थगिती दिल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के स्थगिती उठवली आहे, शेवटच्या स्थगिती आहेत, त्या कामांना मंजुरी देताना कोणत्याही तरतुदी पाळल्या नाहीत. नियम न पाळता खर्च केले. त्याचा पुनर्विचार करुन आवश्यक त्या स्थगिती उठवू आणि कुणावरही अन्याय होणार नाही, योग्य आणि आवश्यक निर्णय घेऊ, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार