वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 17:39 IST2016-07-25T17:39:11+5:302016-07-25T17:39:11+5:30

गत आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारपासून जिल्ह्यात दमदार पुनरागमन करून शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला

Wasting rain in the district! | वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. २५ : गत आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारपासून जिल्ह्यात दमदार पुनरागमन करून शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला. सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून, कुठेही जीवित वा वित्त हाणी झाल्याचे वृत्त नाही.
२४ जुलै रोजी वाशिम तालुक्यात १.५० मीमी पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण ४८३.४० मीमी पावसाची नोंद असून, हा पाऊस सरासरीपेक्षा १७ टक्क्याने जास्त आहे.

मालेगाव तालुक्यात २४ जुलै रोजी १९ मीमी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण ४०८ मीमी पावसाची नोंद असून, हा पाऊस सरासरीपेक्षा चार टक्क्याने जास्त आहे. रिसोड तालुक्यात २४ जुलै रोजी ६२ मीमी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण ५२३ मीमी पावसाची नोंद असून, हा पाऊस सरासरीपेक्षा ५७ टक्क्याने जास्त आहे. मंगरुळपीर तालुक्यात आतापर्यंत एकूण ४०९ मीमी पावसाची नोंद असून, हा पाऊस सरासरीपेक्षा १९ टक्क्याने जास्त आहे.

मानोरा तालुक्यात २४ जुलै रोजी आतापर्यंत एकूण ५५९ मीमी पावसाची नोंद असून, हा पाऊस सरासरीपेक्षा ५९ टक्क्याने जास्त आहे. कारंजा तालुक्यात २४ जुलै रोजी चार मीमी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण ५७६ मीमी पावसाची नोंद असून, हा पाऊस सरासरीपेक्षा ६२ टक्क्याने जास्त आहे.

सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान दुपारनंतर रिसोड, मालेगाव, वाशिम, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रकल्पांमधील जलाशयांमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात असून पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे

Web Title: Wasting rain in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.