घनकचरा व्यवस्थापनात भुसावळमध्ये अपहार
By Admin | Updated: October 12, 2014 02:00 IST2014-10-12T02:00:54+5:302014-10-12T02:00:54+5:30
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यंत्र घेण्याच्या नावाखाली 32 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

घनकचरा व्यवस्थापनात भुसावळमध्ये अपहार
>भुसावळ : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यंत्र घेण्याच्या नावाखाली 32 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या पाश्र्वभूमीवर माजी नगराध्यक्षांसह 33 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पालिकेतील गैरव्यवहाराप्रकरणी सलग दुस:या दिवशी गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आह़े भुसावळ म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस़ एल़ पाटील यांनी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. त्यावर न्या़ वैशाली ढवळे यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़
आरोपींमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष माधुरी फालक, तत्कालीन नगरसेवक महेश चोपडे, शेख सलमा इरफान, तरन्नुम इद्रीस, चंदन रामचरण, उल्हास पाटील (मृत), वसंत पाटील, समीर कृष्णधन, चेतना फालक, मनोज बियाणी, शारदा धांडे, सलीम खान, शेख शफी, संजय तडवी, लता
पाटील, नंदा निकम, श़े अहमद श़े इब्राहीम कुरेशी, आशिक खान, सुरेश देवकर, पुरुषोत्तम नारखेडे, हरीश फालक, हरेशकुमार नागदेव, संगीता बियाणी, शांताराम इंगळे, शाकीर शेख, कांताबाई चौधरी, शालिनी कोलते, नीळकंठ फालक, रमाकांत महाजन, राजेंद्र ब:हाटे, सुनील नेवे, रमेश नागराणी, तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांचा समावेश आहे.
घनकचरा व्यवस्थापनात प्रकल्पात कचरा गोळा केल्यानंतर मशिनरीद्वारे त्यातून खतनिर्मिती केली जाणार होती़ प्रत्यक्षात ना हा प्रकल्प उभा राहिला, ना मशिनरीची खरेदी झाली. संगनमताने अपहार करण्यात आला आहे. - एस़ एल़ पाटील, तक्रारदार