शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यास दिला होता नकार; के.पी रघुवंशींचा दावा, कुणाचा आला होता फोन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:48 IST

के.पी रघुवंशी यांना २०१० साली त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली केले होते.

मुंबई - पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर जवळपास १ दशकांनी महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख के.पी रघुवंशी यांनी मोठा खुलासा केला आहे. रघुवंशी यांच्या काळात त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आरएसएसचे पदाधिकारी इंद्रेश कुमार यांच्यासह बड्या लोकांवर अटकेसाठी दबाव आणला होता असं त्यांनी म्हटलं आहे. 

PTI  च्या माहितीनुसार, या दाव्यांबाबत पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी लिहिलेल्या ऑथराइज्ड बायोग्राफी ट्रबलशूटर यात सविस्तर लिहण्यात आले आहे. हे पुस्तक याच आठवड्यात मुंबईत प्रकाशित झाले. या पुस्तकात म्हटलंय की, के.पी रघुवंशी यांना त्या काळात यूपीए सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्‍यांचा फोन आला होता. ज्यात २००८ च्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात इंद्रेश कुमार यांना अटक करण्यास सांगितले होते. त्यानंतर रघुवंशी यांनी मंत्र्‍यांना स्पष्टपणे असं करण्यास नकार दिला होता. कुठलेही ठोस पुरावे नसताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकत नाही असं रघुवंशी यांनी मंत्र्‍यांना सांगितले होते.

याच पुस्तकात एका जुन्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ मंत्र्‍याने १९९३ साली मुंबईत दंगलीच्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली होती. के.पी रघुवंशी यांनी त्यांच्या मागणीचा विरोध केला होता. के.पी रघुवंशी यांना २०१० साली त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली केले होते. त्यांची बदली कथितपणे दबावांना झुगारल्यामुळे करण्यात आल्याचा दावा पुस्तकात केला आहे. मात्र या पुस्तकात थेट कनेक्शनबाबत कुठलेही डॉक्युमेंट्री प्रूफ दिले नाहीत. 

या पुस्तक प्रकाशनावेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी होते. ज्यात माजी महासंचालक ए.एन रॉय यांचाही समावेश होता. त्यांनी के.पी रघुवंशी यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रसिद्ध केले. या कार्यक्रमाला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, माजी सीबीआय संचालक सुबोध जैस्वाल, माजी डीजीपी रश्मी शुक्ला, सध्याचे एटीएस प्रमुख नवल बजाज हजर होते. के. पी रघुवंशी २०१५ साली महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या डायरेक्टर जनरलपदावरून निवृत्त झाले होते. ते सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सच्या विजिलेंस युनिटचे प्रमुख आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Raghuvanshi refused Balasaheb Thackeray's arrest; claims pressure from minister.

Web Summary : Ex-ATS chief K.P. Raghuvanshi claims ministers pressured him to arrest Balasaheb Thackeray and Indresh Kumar. He refused lacking evidence. He was transferred from ATS for resisting pressure.
टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे