अशी झाली लीनावर कारवाई
By Admin | Updated: June 3, 2015 03:51 IST2015-06-03T03:51:55+5:302015-06-03T03:51:55+5:30
अभिनेत्री लीनाच्या फसव्या योजनांची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरिक्षक दिनेश जोशी, निरीक्षक फडतरे, जगदीश कुलकर्णी, तन्वीर शेख, एपीआय अतुल केदार

अशी झाली लीनावर कारवाई
मुंबई: अभिनेत्री लीनाच्या फसव्या योजनांची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरिक्षक दिनेश जोशी, निरीक्षक फडतरे, जगदीश कुलकर्णी, तन्वीर शेख, एपीआय अतुल केदार, फौजदार अजय कदम आणि पथकाने २९ मे रोजी इन्फिनिटी मॉलमध्ये धाड घातली. तेथून या फसव्या योजनांचे पुरावे पथकाच्या हाती लागले.
पुढे लीना व सेकर यांच्या गोरेगावच्या इम्पिरीयल हाईट्स इमारतीतील फ्लॅटवरही या पथकाने धाड घालून घोटाळ्याशी संबंधित पुरावे गोळा केले. लीना व सेकर यांना प्राथमिक चौकशीत समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यांना लागलीच अटक करण्यात आली. तर त्यांच्या चौकशीतून आदील हुसेन अख्तर जयपुरी (२५), अख्तर हुसेन जयपुरी (५५), नासीर मुमताज जयपुरी (५०) आणि सलमान फिरोज रिझवी हेही या घोटाळ्यात सहभागी असल्याची माहिती पुढे आली.यापैकी अख्तर व नासीर ही ख्यातनाम गीतकार हसरत जयपुरी यांची मुले असून, आदील हा नातू असल्याची माहिती देण्यात आली. लीना आणि सेकर यांच्याकडून प्रत्येकी १ लाख रुपये किमतीची तब्बल ११७ घड्याळे, आॅडी, बेन्टले, निसान, मर्सिडीज अशा पाच कोटी किमतीच्या ९ कार, ३७ लाख किमतीचे १२ मोबाइल आणि साडेतीन लाखांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला. (प्रतिनिधी)